Minimum temperature : किमान तापमान घसरतेय, तरीही सरासरीपेक्षा अधिकच
1 min read
महाराष्ट्रातील दुपारचे कमाल तापमान सध्या 29 डिग्री सेंटिग्रेड दरम्यान म्हणजे सरासरीपेक्षा 1 ते दीड डिग्री सेंटिग्रेडने अजूनही कमी आहे. म्हणजे सध्या जाणवत असलेला थंडावा अद्याप कायमच आहेच. ही सरासरी गाठण्यासाठी अजून दिवसा अधिक ऊबदारपणा अपेक्षित आहे. म्हणून तर आर्द्रताही कमी आहे.
बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळाचा काळ संपतच येत आहे. डिसेंबर हा महिना यासाठीचा शेवटचा महिना समजावा. भारत समुद्रीय क्षेत्रात चक्रीवादळाची सध्या कोणतीही बीजरोवणी नाही. उर्वरित या महिन्यात महाराष्ट्रावर चक्रीवादळाचा कोणताही प्रभाव असणार नाही, असे दिसते. त्यामुळे डिसेंबर महिन्यात जी काही थंडी सध्या जाणवत आहे आणि जी उर्वरित महिन्यात जाणवणार आहे, ती हिरावण्याची शक्यताही सध्या मावळली आहे. त्यामुळे थंडीसाठी ही एकत्रित एक जमेची बाजूच समजावी. आगाप पेरीची/लागवडीची रब्बी शेतपिके व फळबागांसाठी त्यामुळे थंडीची ही स्थिती अनुकूलच असेल.
तीव्र एल निनो(El Nino)च्या शक्यतेमुळे रब्बी हंगामाच्या उत्तर्धात उष्णतेत होवू शकणाऱ्या वाढीमुळे पुढे सरासरी अपेक्षित जोरदार थंडीबद्दल थोडी साशंकता असून, लेट पेर/लागवडी पिकांतील फळ व धान्य पोसण्यास कदाचित अडचणीही जाणवू शकतात. डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात सध्या तरी नजीकच्या काळात पावसाची शक्यता जाणवत नाही. शिवाय, उत्तर भारतात किमान तापमान सध्या एकांकीपर्यंत पोहोचले आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.