krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Winter cold : थंडी फक्त दिवसाच, पहाटेचा गारवा कमी

1 min read
Winter cold : सन २०२३ हे एल-निनो(El Nino)चे वर्ष असल्याने यावर्षी दरवर्षीसारखी थंडी (cold) नाही. यावर्षी ही थंडी कशी वळण घेऊ शकते, हे बघणेही गमतीशीर आहे. शुक्रवार (दि. 8 डिसेंबर)पासून डिसेंबर महिन्याच्या थंडीला जरी सुरुवात झाली असली तरी सध्याचा थंडीचा पॅटर्न जरा वेगळाच जाणवतो आहे.

✳️ सध्याचे दुपारचे कमाल तापमान व त्याचा परिणाम
विदर्भ वगळता कोकणासह उर्वरित महाराष्ट्रात सध्या दुपारचे कमाल तापमान (Maximum temperature) हे 27 डिग्री सेल्सिअसच्या तर विदर्भात 25 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान जाणवत आहे. म्हणजेच दरवर्षीच्या सरासरी तापमानापेक्षा विदर्भात जवळपास 4 डिग्री सेल्सिअसने तर कोकणासह उर्वरित महाराष्ट्रात 2 डिग्री सेल्सिअसने कमी आहे. दुपारच्या तापमानातील ही ठळक व स्पष्ट जाणवणारी मोठी घसरण आहे. त्यामुळे दिवसा चांगलीच थंडी जाणवत आहे.

✳️ सध्याचे पहाटेचे किमान तापमान व त्याचा परिणाम
खरं तर डिसेंबर हा अती थंडीचा महिना मानला जातो. थंडीची तीव्रता मोजण्याचा (म्हणजे थंडी कमी किंवा जास्त) हा किमान तापमान किती आहे? हेच ठरवते. म्हणजे थंडी तीव्रता ठरविण्याचा निर्देशक घातांक किमान तापमानच आहे. सध्याचे किमान तापमान हे सरासरी इतके किंवा त्यापेक्षा कमी असावयास हवे. तरच चांगली थंडी जाणवते. परंतु यावर्षी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे 17 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान जाणवत आहे. हे दरवर्षीच्या सरासरी तापमानापेक्षा कोकण व दक्षिण महाराष्ट्रात 2 डिग्री सेल्सिअसच्या तर उर्वरित महाराष्ट्रात जवळपास 4 डिग्री सेल्सिअसने अधिक आहे. त्यामुळे थंडी जाणवण्यास सुरुवात झाली, पण त्याचा म्हणावा तसा कडाका जाणवत नाही.

✳️ डिसेंबरची सध्याची सापेक्ष आर्द्रता व त्याचा फायदा
संपूर्ण महाराष्ट्रात सध्या डिसेंबर महिन्यात दैनिक सापेक्ष आर्द्रता (Relative humidity) सकाळच्या वेळी 75 ते 85 टक्क्यांच्या आसपास तर दुपारनंतरची सापेक्ष आर्द्रता ही 55 ते 65 टक्क्यांदरम्यान जाणवत आहे. हे दरवर्षीच्या डिसेंबर महिन्यातील सरासरी सापेक्ष आर्द्रतेपेक्षा जवळपास 10 ते 20 टक्क्यांनी कमी आहे. ही ठळक व स्पष्ट जाणवणारी मोठी टक्क्यांमधील घसरण आहे. त्यामुळे दिवसा चांगलीच थंडी तर जाणवते, पण निरभ्र आकाशामुळे सूर्यप्रकाशाला अडथळा नसल्यामुळे तोही भरपूर असला तरी या दिवसात दिवसाची लांबीही कमी असते. अशा परिस्थितीत दैनिक सापेक्ष आर्द्रताही सरासरीपेक्षा खूप आणि खूपच घसरली आहे. साहजिकच दमटपणा कमी आहे. हवेत कोरडेपणा वाढला आहे. म्हणून सध्या वाढलेल्या किमान तापमानातही सकाळी थंडी जाणवत आहे.

✳️ उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे वहनही कमी
उत्तर भारतात एकापाठोपाठ पश्चिमी झंजावात वायव्येकडून पूर्वेला मार्गस्थ होत आहे. त्यामुळे तेथे थंडी व बर्फ (Cold and Snow) पडत आहे. परंतु, ती थंडी खेचण्यासाठी पुरेसे कमी दाब क्षेत्रे महाराष्ट्रात नसल्यामुळे ईशान्यई वारे कमकुवत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या भू-भागावर मूळ स्रोताचे थंड वारे लोटले जात नाही. म्हणून कडाक्याच्या थंडीचा अभाव दिसत आहे.

✳️ दव, बादडचे प्रमाण कमी
सध्या प्रतिकूल वातावरणामुळे सकाळी दव (Dew) किंवा बादड विशेष पडत नाही. म्हणजे दरवर्षी पडते त्यापेक्षा कमी आहे. त्याची कारणमिमांसा बघितल्यास असे दिसते की,
🔆 निरभ्र आकाश.
🔆 शांत वारा.
🔆 जमिनीतील कमी ओलावा.
🔆 जमिनीपासून 2-3 किमी टक्केवारीत कमी असलेली (साधारण 60-70 कडे झुकणारी) सापेक्ष आर्द्रता.
🔆 निरभ्र आकाशामुळे सूर्याकडून येणारी व जमिनीला मिळणारी पुरेशी उष्णता.
🔆 पहाटचे किमान तापमान व दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा जवळपास तीन डिग्री ने वाढ.
🔆 असमान हवेचा दाब म्हणजे पहाटच्या व उशिरा सकाळपर्यंत त्यात होणारा लक्षणीय बदल.
🔆 रात्रीचा वाढलेला दवांक निम्न पातळी (खोली)चा निर्देशंक.
🔆 सध्याच्या या सर्व वातावरणीय कारणांमुळे सध्या पहाटच्या वेळी खूप दव किंवा बादड पडत नाही. त्यामुळे शेतपिकांना फायदा होत आहे.
🔆 थंडीचा हा पॅटर्न कदाचित संपूर्ण हिवाळ्यात म्हणजे फेब्रुवारी अखेरपर्यंत असाच राहू शकतो. फेब्रुवारी व मार्चमध्ये होणारी गारपीटही कमी होवू शकते. दव, बादड पडण्याचे प्रमाणही कमी राहू शकते.

✳️ थंड वाऱ्यांचे वहनही कमी
उत्तर भारतात एकापाठोपाठ पश्चिमी झंजावात वायव्येकडून पूर्वेला मार्गस्थ होत आहे. त्यामुळे तेथे थंडी व बर्फ पडत आहे. परंतु, ती थंडी खेचण्यासाठी पुरेसे कमी दाब क्षेत्रे महाराष्ट्रात नसल्यामुळे ईशान्यई वारे कमकुवत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या भू-भागावर मूळ स्रोताचे थंड वारे लोटले जात नाही. म्हणून कडाक्याच्या थंडीचा अभाव दिसत आहे.

या महिन्या अखेरपर्यंतच चक्रीवादळ (cyclonic storm) व आयओडी (Indian Ocean Dipole)चा काळ असून, नंतर संपणार आहे. एल-निनो (El Nino) त्याच्या तीव्रतेत असल्यामुळे डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी असून, पाऊस झाला तरी तो डिसेंबर महिन्याच्या मासिक सरासरीपेक्षा कमी असू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!