Cyclone and Cold : आठवडा चक्रीवादळाचा व हुडहुडीचा!
1 min read
बंगालच्या उपसागरात गुरुवारी (दि. 16 नाेव्हेंबर) अस्तित्वात असलेले अतितीव्र कमी दाब क्षेत्राचे (Low pressure areas) शुक्रवारी (दि. 17 नोव्हेंबर) चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतरच त्याचे नामकरण होवून शनिवारी (दि. 18 नोव्हेंबर) सकाळी ते बांगलादेशच्या किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता जाणवते.
या सर्व व इतर पूरक वातावरणीय घडामोडीतून शनिवार (दि. 19 नाेव्हेंबर) ते बुधवार (दि. 23 नोव्हेंबर) या पाच दिवसादरम्यान महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, परभणी व हिंगोली या जिल्ह्यात वातावरण काहीसे ढगाळलेले राहील तसेच कमाल व किमान तापमानात काहीशी वाढ होवून वातावरणात उबदारपणा जाणवेल, असेही माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले.
हे सर्व असले तरी अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाब क्षेत्र अथवा चक्रीय वादळ निर्मिती शक्यतेतून नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारच्या पावसाची शक्यता जाणवत नाही. ‘एल-निनो’ (El Nino) सध्या मध्यम ते उच्च तीव्रतेत असला तरी धन ‘आयओडी’ (Indian Ocean Dipole) व भारत महासागरीय विषुवृत्त परीक्षेत्रात एकापेक्षा अधिक आम्प्लिटुडने कार्यरत असलेला ‘एमजेओ# (Madden–Julian oscillation)मुळे बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ व तामिळनाडू, केरळातील ईशान्य हिवाळी मान्सूनच्या गतिविधितेला चालना मिळत आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.