krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Onion Plant Cultivation Technology : कांदा रोप लागवड तंत्रज्ञान

1 min read
Onion Plant Cultivation Technology : कांद्याचे (Onion) उत्तम उत्पादन (production) घेण्यासाठी योग्य जातीची निवड करण्यासाेबतच रोपनिर्मिती (plant production) करणे आवश्यक आहे. शेतकरी रोपवाटिका (Nursery) तयार करण्याकडे फारसे लक्ष देत नसल्याने लागवडीसाठी चांगली रोपे उपलब्ध होत नाहीत. याचा कांदा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. रोपे तयार करण्यासाठी बियाणे हंगामानुसार चांगल्या जातीचे व उत्तम उगवण क्षमतेचे हवे. बरेचदा शेतकरी रोपे विकत घेतात व त्यात त्यांची फसवणूक होते. म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःच रोपे तयार केली पाहिजेत. रोपवाटिकेचे आधुनिक तंत्रज्ञान (Nursery Technology) आत्मसात केल्यास शेतकऱ्यांना त्याचा नक्की फायदा होईल.

या रब्बी हंगामासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात बियाणे रोपवाटिकेमध्ये नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात सपाट वाफ्यामध्ये 12.5 x7.5 सें.मी. वर दाट टाकून लागवड (Cultivation) केली जाते. परंतु, ओल्यात लागवड करण्यापेक्षा लसणासारखी कोरड्यात लागवड केली असता एकसारखी दाट लागवड होऊन मध्यम आकाराच्या कांद्याचे अधिक उत्पादन मिळते व असे कांदे साठवणुकीयोग्य असतात. 15 नोव्हेंबरपर्यंत लागवड पूर्ण झाल्यास 15 मार्चपर्यंत कांदे मिळतात. या काळात कांद्याचे सर्वात जास्त उत्पादन मिळते.

🟢 रोप तयार करणे
कांदा रोपवाटिकेची जागा विहिरी जवळ असावी, म्हणजेच वेळीच पाणी देणे सोपे होते. निरोगी रोपे तयार करण्याच्या दृष्टीने रोपे नेहमी गादी वाफ्यावरच तयार करावीत. कारण गादी वाफ्यावर रोपांची वाढ एकसारखी होते. मुळांच्या भोवती पाणी फार काळ साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यामुळे रोपे कुजणे, सडणे हे प्रकार होत नाहीत आणि मुळांद्वारे अन्नद्रव्याचे शोषण चांगले होवून रोपांची गाठी जड व लवकर तयार होतात.

🔆 एक हेक्टर कांदा लागवडीसाठी साधारणपणे 5-6 गुंठे क्षेत्रावरील रोपे पुरेसी होतात.
🔆 रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे 1 मीटर रुंद, 3 मीटर लांब व 15 सें.मी. उंच असावेत.
🔆 वाफे नेहमी भुसभुशीत असावेत. गादी वाफे नेहमी उताराला आडवे करावेत.
🔆 प्रत्येक वाफ्यात 1-2 घमेले चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत व 250 ग्राम 15:15:15 किंवा 19:19:19 खत, त्याचबरोबर 50 ग्राम कॉपर ऑक्सीक्लोराईड व 20 ग्राम कार्बारील भुकटी यांचे मिश्रण मिसळून 10 सें.मी. अंतरावर उथळ रेषा ओढून पातळ बियाणे प्रति वाफ्यात 15 ग्राम याप्रमाणे पेरणी करावी.
🔆 वाफ्यातील दगड किंवा बारीक डेकळे वेचून घ्यावेत. वाफा सपाट करावा. वाफ्याच्या रुंदीशी समांतर चार बोटे अंतरावर काडी अथवा खुरप्याच्या सहाय्याने 1 ते 1.5 सें.मी. खोलीपर्यंत रेघा पाडाव्यात आणि त्यात पातळ बी पेरून मातीने झाकून टाकावे.
पहिले पाणी जेमतेम वाफ्यावर फिरेल अशा पद्धतीने द्यावे. त्यानंतर पाणी बेताने 7 ते 8 दिवसाच्या अंतराने द्यावे.
🔆 रोपांच्या ओळीमधील माती हलवून घ्यावी. म्हणजे रोपाच्या मुळाभोवती हवा खेळती राहते. रोपांच्या ओळीमधील माती हलवून घ्यावी. त्यानंतर पाणी बेताने 7 ते 8 दिवसाच्या अंतराने द्यावे.
रोपांच्या ओळीमधील माती तयार झाली म्हणजे पुनर्लागवडीसाठी रोपे तयार झाले असे समजावे.
🔆 रब्बी हंगामातील कांद्याची रोपे 8 ते 9 (50 ते 55 दिवस) आठवड्यात लागवडीसाठी तयार होतात.
🔆 पाने पिवळी पडल्यास 1 टक्का युरिया (100 ग्राम युरिया 10 लिटर पाण्यात मिसळून) अथवा 2 टक्के डीएपी (200 ग्राम डीएपी 10 लिटर पाण्यात मिसळून) फवारणी करावी.

🟢 रोपवाटिकेतील रोग व कीड व्यवस्थापन
🔆 रोपवाटिकेत मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. याकरिता बी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 4 ते 5 ग्राम ट्रायकोडर्मा किंवा 2 ते 3 ग्राम थायरम अथवा कॅप्टन किंवा बाविस्टिन हे बुरशीनाशक चोळावे.
🔆 साधारणपणे प्रत्येक चौरस मीटर क्षेत्रात 10 ग्राम बी पेरावे. रोप तयार होत असताना त्यावर फुलकिडे व शेंडे जळणे या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फिप्रोनील 1 मि.ली. किंवा प्रोफेनोफॉस 1 मि.ली. प्रति लिटर पाण्यात फवारणी करावी. काळा करपाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 1 ग्राम, जांभळा व तपकिरी करपा नियंत्रणासाठी ट्रायसायक्लॅझोल 1 किंवा हेक्साकोनॅझोल 1 ग्राम प्रति लिटर पाण्यात फवारणी करावी.
🔆 कांद्याची पुनर्लागण करताना रोपे काढण्यापूर्वी 24 तास अगोदर गादी वाफ्याला पुरेसे पाणी द्यावे म्हणजे रोपे उपटतांना मुळांना इजा होणार नाही. पुनर्लागवण करतान रोपे 10 लिटर पाण्यात 20 मिलि कार्बोसल्फान व 10 ग्राम कार्बेन्डाझिम मिसळून त्तया रोपांची मुळे दीड ते दोन तास बुडवून ठेवावीत. त्यानंतर अॅसटोबेक्टर व पीएसबी या जैविक बुरशीनाशकाच्या द्रावणात रोप बुडवून नंतर लागवड करावी.
🔆 रोपवाटिकेत तणनाशकाचा वापर टाळावा. रोग व व किडींचा वेळेवर बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
🔆 रब्बी हंगामासाठी एन-2-4-1, अर्क निकेतन, फुले सफेद, फुले सुवर्णा या वाणांची निवड करावी.

🟢 रब्बी हंगामातील कांदा लागवड
🔆 वाण :- एन-2-4-1, ॲग्री फाउड लाईट रेड, अर्का निकेतन, फुले सफेद, फुले सुवर्णा.
🔆 रोपे तयार करण्याचा महिना :- ऑक्टोबर-नोव्हेंबर.
🔆 कांदा रोप पुनः लागवडीचा महिना :- नोव्हेंबर-डिसेंबर.
🔆 कांदा काढणी :- एप्रिल-मे.
🔆 पातीच्या वाढ :- 65 ते 70 दिवसात.
🔆 कांदा पोसण्यासाठी :- 55 ते 60 दिवस.
🔆 पुनर्लागवण केल्यानंतर
🔆 पुर्नलागण केल्यानंतर 135 ते 140 दिवसात काढणी.
🔆 साठवण क्षमता जास्त.
🔆 उत्पादन 30 ते 35 टन.

©️ ऐश्वर्या राठोड,
आचार्य पदवी विद्यार्थिनी, कृषिविद्या विभाग,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर.
संपर्क :- 8411852164

©️ डॉ. आदिनाथ ताकटे,
मृद शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. जिल्हा अहमदनगर.
संपर्क :- 9404032389
मेल :- aditakate@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!