krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Sporadic rain : महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किरकाेळ पाऊस

1 min read
Sporadic rain : पुढील आठवड्यात मुंबई व कोकण वगळता महाराष्ट्रातील इतर भागात पावसाची शक्यता कमीच आहे. शनिवार (दि.5 ऑगस्ट)पर्यंत राज्यात ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी किरकोळ ते मध्यम पावसाच्या वातावरणानंतर रविवार (दि. 6 ऑगस्ट)पासून पुढील आठवडाभर म्हणजे रविवार (13 ऑगस्ट)पर्यंत मुंबई व कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची (Sporadic rain) शक्यता जाणवते.

✴️ मुंबईसह कोकणात अति जोरदारपणे कोसळलेल्या पावसाची तीव्रताही येत्या या आठवड्यात काहीशी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सह्याद्रीच्या घाटमाथा धरण जलसंचय क्षेत्रात गेली 40 दिवस जोरदारपणे कोसळलेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठा 1 ऑगस्टला 70 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. परंतु, तेथेही आता पावसाचे प्रमाण काहीसे कमी होण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे धरणे 100 टक्के भरून ओसंडणे व नदी-नाल्यांना पूर पाण्याच्या अपेक्षेसाठी चांगलाच कस लागणार आहे.

✴️ एकंदरीत पावसाच्या पाण्यावर जगवलेली खरीपातील पिकांना चांगल्या पावसाअभावी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात ओढ बसण्याची शक्यता जाणवते. तसेच खरीपासारखेच येणाऱ्या रब्बी हंगामाच्या नियोजनासाठीही जपून पावले टाकावी लागतील.

✴️ वातावरणात खास बदल जाणवला तरच पुढील मॅसेज पाेस्ट केला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!