krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Purandar Upsa Kendra : पुरंदर उपसा केंद्र – मृत्यू वाहिनी

1 min read
Purandar Upsa Kendra : आम्ही पुरंदर उपसा केंद्रातून (Purandar Upsa Kendra) पुरंदर (जिल्हा पुणे) तालुक्यातील अनेक गावांना जाणारे पाणी (water) तपासले असता संतापजनक व धक्कादायक माहिती समाेर आली. पुणेकरांचे घरगुती सांडपाणी (Domestic sewage), कचरा (garbage) प्रक्रिया न करता मुळा-मुठा नदीमध्ये सोडल्यामुळे नदीमध्ये प्रदूषण (Pollution) वाढले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या नदीचे वर्गीकरण प्राधान्य क्रमांक-1 (सर्वोच्च धोकादायक वर्ग) या गटात केले होते.

या नदीच्या शुद्धीकरणासाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जायका), केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय’ आणि पुणे महापालिकेमध्ये 23 फेब्रुवारी 2015 ला करार झाला होता. सन 2022 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजनही झाले. तरी सुद्धा या प्रकल्पाचे काम गतीने न होता रेंगाळले आहे. या प्रकल्पांतर्गत 11 नवे सांडपाणी प्रक्रिया केंद्र (Sewage Treatment Plant) बांधले जाणार होते.

हे प्रदूषित पाणी (Polluted water) या भागातील विविध गावे जसे दिवे, माळशिरस, राजेवाडी, पोंदे, उदाजीवाडी, सोनवरी, वणपुरी, शिनगापूर, गुरवळी, पारगाव, वाघापूर वगैरे ठिकाणी शेतीसाठी दिले जाते. ते नंतर झिरपून विहिरी, बोअरमध्ये जाऊन पिण्यासाठी वापरले जाते. काही ठिकाणी जल जीवन मिशनमध्ये हेच पाणी वापरतात. पावसाळ्यात ही घाण उजनी धरणात जाऊन मिळते.

आम्ही दोन्ही ठिकाणच्या (शेतीसाठीचे व पिण्याचे विहिरीमधील) पाण्याचे सॅम्पल घेऊन टेस्ट केले. पिण्याच्या पाण्यासाठीचे आवश्यक निकष (Acceptable Limits) इंडियन स्टॅंडर्ड (मानक) BIS 10500 प्रमाणे आहेत व शेतीच्या पाण्यासाठी BIS 11624 प्रमाणे आहेत. हे दोन्ही पाणी टेस्टमध्ये नापास ठरले आहे. (सोबत टेस्ट रिपोर्ट.) यामध्ये Faecal coliform हा अत्यंत धोकादायक एलीमेंट शून्य पाहिजे. पण प्रत्यक्षात आहे 23. ज्यामुळे मुलांना जुलाब, उलट्या होऊ शकतात. काही ठिकाणी 15 मेंढरे हे पाणी पिऊन मृत्यूमुखी पडल्याची घटना झाली आहे.

या प्रकल्पाच्या खर्चाचे बजेट 700 कोटी रुपयांवरून 5,000 कोटी रुपये करण्यात आले आहे. तिकडे पुणे महानगरपालिका मुळा-मुठा नदी किनाऱ्याच्या सुशोभीकरणला महत्त्व देत आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्वत विकास विषयक (UNO – SDGs – Sustainable Development Goals) मध्ये 6 व्या उद्दिष्टात असे ठरवले आहे की, सन 2030 पर्यंत सर्वांना स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे. स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी ही दुरावस्था. स्वातंत्र्याच्या अमृत काळामध्ये अमृत तुम्हीच प्या. आम्हाला फक्त शुद्ध पाणी द्या.

❇️ एकच ध्यास-शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!