Current status of Monsoon : मान्सूनची सध्याची स्थिती काय आहे?
1 min read
🅾️ या आठवड्यातील पावसाची तीव्रता
✴️ मराठवाडा :- 14, 15 आणि 17 ते 21 जुलै या काळात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता.
✴️ विदर्भ :- 14 ते 16 जुलै मुसळधार तर 17 जुलैपासून जोरदार पावसाची शक्यता.
✴️ मध्य महाराष्ट्र :- 14, 15 जुलै राेजी केवळ मध्यम तर 16 ते 19 जुलै या काळात मुसळधार पावसाची शक्यता.
✴️ मुंबईसह कोकण :- जोरदार सुरू असलेला पाऊस कायम राहण्याची शक्यता.
🅾️ कारणे
✴️ अरबी समुद्रातील मावळलेला ‘ऑफ-शोर-ट्रफ’ची (Off-Shore-Trough) कालपासून (गुरुवार, दि. 13 जुलै) पुन्हा गुजरात ते केरळ किनारपट्टी दरम्यान झालेली पुर्नरस्थापना.
✴️ नेहमीपेक्षा दक्षिणेकडे सरकलेला मान्सूनचा पूर्व-पश्चिम मुख्य आस.
✴️ या मुख्य आसातून दक्षिण उत्तरप्रदेशातील फतेहपूर शहरापासून गुजरात राज्यापर्यंत 2 किमी पासून ते 3 किमी उंचीपपर्यंतच्या एक किमी हवा जाडीत पसरलेला त्या मान्सूनच्या आसाचा एक फाटा यामुळे कोकणाबरोबरच खानदेश ते सोलापूरपर्यंतच्या मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात (विशेषतः घाटमाथा) सध्या पावसाची शक्यता वाढली आहे.
✳️ बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशातील नेल्लोर ओंगोल शहरालगत पूर्व किनारपट्टीसमोर खोल समुद्रातील पृष्ठभागापासून वर उंच साडेचार किमी नंतर ते साडेसात किमी पर्यंतच्या 3 किमी हवा जाडीत घडून येणाऱ्या चक्रीय वाऱ्याच्या (Cyclic wind) अभिसरणीय प्रणालीतून (Circulating system) विदर्भातही पावसाची शक्यता वाढली आहे.
✳️ आजपासून (शुक्रवार, दि. 14 जुलै) तीन दिवसांनी म्हणजे रविवार, दि.16 जुलैला ओडिशा किनारपट्टीसमोर बंगालच्या उपसागरात एक नवीन ‘चक्रीय-वारा अभिसरण’ (Cyclical-wind circulation) प्रणाली निर्मिती अपेक्षित आहे. त्या नंतरच्या तीन दिवसांनी म्हणजेच बुधवार, दि. 19 जुलैला त्याच ठिकाणी प्रणालीचे रुपांतर कमी दाब क्षेत्रात तर शनिवार, दि.21 जुलै दरम्यान तेथेच तीव्र कमी दाब क्षेत्रात रुपांतर होवून त्याचे वायव्य दिशेने मध्य भारताकडे मार्गक्रमण होवू शकते. यामुळे शनिवार, दि. 21 जुलै नंतरच्या (21 ते 27 जुलै) आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता असून याच पावसावर शेवटच्या टप्प्यातील खरीपाची पेरणीची भिस्त अवलंबून राहू शकते.
✳️ ‘एल-निनो’ (El Nino) अजूनही विकसित झालेला नाही. एन्सोच्या तटस्थ (ना, ‘एल-निनो’ वा ना ‘ला-निना’ – La Nina अवस्था) अवस्थेतून तो 1 ऑगस्ट दरम्यान एल-निनोच्या अवस्थेत एन्ट्री करू शकतो. त्यानंतर त्यापुढील आठ महिने (म्हणजे मार्च 2024 अखेर) पर्यंत कार्यरत राहील, असे भाकीत वर्तवले जात आहे.
✳️ ‘मॅडन ज्युलीअन ऑसिलेशन ‘(MJO – Madden Julian Oscillation) सध्या भारत महासागरीय विषवृत्तीय प्रक्षेत्रात बुधवार, दि. 19 जुलैपर्यंतची उपस्थिती भलेही एम्प्लिटुड एकपेक्षा कमी असला तरी सध्याच्या मान्सून काळात पावसाची गतिविधिता वाढवण्यास त्याचीही मदत होण्याची शक्यता जाणवते.
✳️ उत्तराखंड, हिमाचल प्रदेश व दिल्लीत चालू असलेली अतिवृष्टी ओसरते-ना-ओसरते ताेच अजून एक नवीन पश्चिमी झंजावात येण्याच्या तयारीत आहे.