More average rain : या आठवड्यात विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पाऊस
1 min read नागपूर जिल्ह्यासाठी पुढील सात दिवसाचा हवामान अंदाज
नागपुर जिल्ह्यामध्ये, भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर च्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार, पुढील पाच दिवस दिनांक 11 ते 15 जुलै 2023 दरम्यान आकाश आंशिक ते अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
दिनांक 11, 12, 13 व 14 जुलै 2023 रोजी सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे.
दिनांक 15 जुलै 2023 रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे.
दिनांक 16 व 17 जुलै 2023 रोजी बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
दिनांक 13, 14 व 15 जुलै 2023 रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सामान्य सल्ला
पावसाचा अंदाज लक्षात कीडनाशकांची फवारणी तसेच उभ्या पिकात खते देण्याची कामे घेता पुढे ढकलावी व सध्याच्या पावसाच्या उघडीनंतर करावी.
तण व्यवस्थापनासाठी उगवण पश्चात तणनाशकांचा वापर हा जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना आणि शांत आणि स्वच्छ हवामान परिस्थिती असतांना करावा. विभिन्न तणनाशके एकमेकांमध्ये मिसळू नये, विभिन्न सक्रीय घटकांचा तण व्यवस्थापनासाठी सुरक्षित आणि कार्यक्षम तण व्यवस्थापनासाठी फक्त पूर्व-मिश्रित तणनाशकांचा वापर करावा.
आवश्यकता असल्यास सोयाबीन, तूर व कपाशी पिकामध्ये विरळणी आणि खांडे भरून घ्यावे.
मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता हंगामी पिके, फळबागा व भाजीपाला पिकाच्या शेतात पाणी साचून राहणार नाही यासाठी सऱ्या फोडाव्या तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या व इतर पाळीव जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. जनावरे हे खुल्या पाण्याचे स्त्रोत, नदी किंवा तलाव व ट्रॅक्टर व इतर धातूच्या अवजारांपासून दूर ठेवावे.
स्थानिक हवामान अंदाज व सूचना यांचा अंदाज घेऊनच शेती कामाचे नियोजन करावे. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता, शेतकरी व शेतमजूर यांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. शेतातील कामे शक्यतो सकाळच्या वेळी उरकून घेण्याला प्राधान्य द्यावे.
शेतमजुरांना शेतामध्ये एकत्रित समूहाने काम करू न देता दोन व्यक्तीमध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवावे. शेतात आसरा घेताना पाण्याचे स्त्रोत (विहीर, तलाव, नदी इत्यादी), उंच ठिकाणे (झाडे, उंचवटे), धातूचे अवजारे या पासून जास्तीत जास्त अंतरावर आसरा घ्यावा. उंच ठिकाणांवर वीज आकर्षित होत असल्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये झाडाखाली आसरा घेणे टाळावे.
@ सौजन्य :- जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.