krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Citrus Blight Disease : लिंबावरील खैऱ्या रोगाचे व्यवस्थापन

1 min read
Citrus Blight Disease : मागील काही दिवसांपासून विदर्भातील लिंबाच्या (Lemon) मध्ये खैऱ्या राेगाचा (Citrus Blight Disease) प्रादुर्भाव दिसून येत आहे. या राेगामुळे बागा खराब हाेऊन फळांची प्रत खालावत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे या राेगाचे वेळीच याेग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

✴️ रोगाची लक्षणे
लिंबाच्या झाडांच्या पाने, फांद्या व फळांवर ठळकपणे वर आलेले तांबूस चट्टे दिसतात. पानावरील चट्यांच्या सभोवताल पिवळसर वलय तयार होते. चट्टे जस जसे जुने होतात, तस तसे पिवळसर वलयाचे प्रमाण कमी होत जाते. चट्ट्यांचे प्रमाण पानाच्या बाहेरील भागांवर किंवा एका विशिष्ट भागात मर्यादित असतात. फळांवरील चट्टे फक्त बाहेरील सालीवर आढळतात व आतला भाग साबूत राहतो. खैऱ्याचे चट्टे असलेल्या फळांना बाजारात अत्यंत कमी भाव मिळतो.

✴️ रोगाचा प्रसार
खैऱ्या (Citrus Blight Disease) हा रोग झॅन्थोमोनास सिट्री (Xanthomonas citri) या जीवाणूमुळे (Bacteria) होतो. हा जीवाणू मुख्यतः पानं, डहाळ्या आणि झाडांच्या फांद्या यांच्यावर टिकून राहतो व वाऱ्यामुळे आणि पावसामुळे याचे प्रसारण होते. याशिवाय किडे,कापणीचे अवजार, दूषित कापणी यामुळे सुद्धा पसरतो. जून ते सप्टेंबर या काळात ढगाह वातावरण आधिक असते. त्यामुळे या काळात खैऱ्या राेगाची तीव्रता अधिक असते.

✴️ रोग एकात्मिक व्यवस्थापन
लिंबू उत्पादकांनी वेळोवेळी काळजी घेऊन फवारणी केल्यास या रोगाचे वेळीच याेग्य व्यवस्थापन करणे शक्य हाेते. खैऱ्या रोगाचे नियंत्रण एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीने सहज करता येते. त्यासाठी…
❇️ खैऱ्यामुक्त रोपवाटिकेतून रोपांची निवड करणे.
❇️ झाडांना असलेल्या राेगयुक्त डहाळ्यांचा उन्हाळ्यात नाश करणे व बागेची नियमित छाटणी करणे.
❇️ पावसाळ्याच्या सुरुवातीला काॅपर ऑक्सिक्लोराईड (Copper Oxychloride) (3 ग्राम प्रति लिटर पाण्यात) किंवा बोर्डेक्स मिक्चर – Bordeaux Mixture 1 टक्का एक किलाे ग्राम चुना प्रति 100 लिटर पाण्यात) आणि स्ट्रेप्टोसायक्लीन (Streptocycline)(100 मिलिग्राम प्रति लिटर पाण्यात)ची 3 ते 4 वेळा प्रत्येक महिन्यात फवारणी करणे.
❇️ कडूलिंबाच्या ढेपीचे मिश्रण (1 किलो प्रति 20 लिटर पाणी) यांची फवारणी करावी किंवा शिंपडणे.
❇️ प्रत्येक झाडाची छाटणी केल्यावर अवजार (सिकेचर) 2 टक्के सोडीयम हायपोक्लाराईड (Sodium hypochlorite) द्रावणाने निर्जंतूक करावे.
❇️ छाटणी केल्यावर डहाळी/फांद्या लगेचच जाळून टाकाव्या.
❇️ नवीन आलेल्या पालवीवर योग्यरित्या फवारणी करावी व फवारणी संपूर्ण झाडावर होत असल्याची खात्री करावी.
❇️ पाने पोखरणाऱ्या अळीच्या (सीट्र्स लीफ माइनर-Citrus Leaf Minor) प्रादुर्भावाने खैऱ्या रोगाच्या संसर्गाला मदत होते. त्यामुळे नवतीवर कीटकनाशकाद्वारे पोखरणाऱ्या अळीचे वेळीच व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
❇️ या व्यतिरिक्त इतर हंगामात व अवकाळी पावसाच्या अधूनमधून सरी आल्यास अतिरिक्त फवारणी करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!