Rain Posibility : या आठवड्यात मध्यम पावसाची शक्यता
1 min read
महाराष्ट्रात आतापर्यंत भाग बदलत झालेल्या पावसामुळे आठ इंचापर्यंतच्या पूर्ण ओलीवर काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची (Soybean) पेरणी (Sowing) केली आहे तर काही भागात पेरणी सुरू आहे. जेथे खास ओल नाही, तेथे पेरणीसाठी वाट पाहण्याचा काळ जरी अंतिम टप्प्यात असला तरी अजूनही वाट पाहण्यास तेथे वाव आहे. शिवाय, त्यानंतरही 21 जुलैपासून पावसाच्या शक्यतेमुळे पूर्ण पेर ओलीसाठी वाट पहावी. शेवटी निर्णय शेतकऱ्यांनीच घ्यावा.
बद्रीनाथ, केदारनाथ येथे अजून आठवडाभर पावसाचा धुमाकूळ असाच कायम राहू शकताे. त्यानंतर तेथील जनजीवन पूर्वपदावर येण्यास पुढील 15 ते 20 दिवसांचा काळ लागू शकताे. तेव्हा पर्यटकांनी किमान एक महिन्यापर्यंत तेथील पर्यटनाचा विचार करू नये.