El Nino, IOD : पावसाळ्यात ‘एल-निनो’चा दणका तर ‘आयओडी’चा दिलासा
1 min read
✴️ देशात 96 ते 104 टक्के श्रेणीत पडणारा पाऊस (Rain) हा जरी सरासरी इतका पाऊस मानला जात असला तरी, या वर्षी देशात गुणात्मकदृष्ट्या (Qualitatively) केवळ 96 टक्के अधिक 4 पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे नकारात्मक शक्यतेच्या अंकानुसार ही शक्यता (96-4) म्हणजे 92 टक्के येते. जी सरासरीपेक्षा कमी (> 90 ते 95 टक्क्यांपेक्षा कमी) पावसाच्या श्रेणीत मोडते, हे ही येथे लक्षात घेणे गरजेचे वाटते. येथेही ही नकारत्मकताही (Negativity) जाणवते.
✴️ प्रॉबॅबिलीटीच्या (Probability) भाषेत देशात सरासरीइतका पावसाचे भाकीत वर्तवतांना सर्वाधिक ‘भाकीत संभाव्यता’ ही 43 टक्के आली आहे तर, सर्वाधिक ‘वातावरणीय संभाव्यता’ ही 33 टक्के आली आहे. बाकी सर्व शक्यता या वरील दोन अंकांच्या खालीच आहे.
✴️ आता या दोन्हीही शक्यता संकल्पना स्पष्ट करतांना संपूर्ण 2022-23 वर्षात जागतिक पातळीवरून गेल्या आठ महिन्यांपासून भाकितासाठी आवश्यक असलेली सर्व गोळा केलेल्या निरीक्षणांची नोंद व त्यावरून निष्कर्षांप्रत आलेली शक्यता म्हणजेच ‘भाकीत संभाव्यता’ होय. तर आतापर्यंत उपलब्ध असलेल्या डेट्यावरून निष्कर्षांप्रत आलेली शक्यता म्हणजे ‘वातावरणीय संभाव्यता’ होय.
🌐 महाराष्ट्रासाठी काय?
✴️ महाराष्ट्र हा मध्य भारत विभागात मोडतो. मध्य भारतात जरी सरासरी इतका पाऊस वर्तवला असला तरी ‘टरसाइल’ श्रेणी प्रकारनुसार सांगली जिल्हा वगळता संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रात सरासरी पेक्षा कमीच पावसाचीच शक्यता असून ही सर्वाधिक शक्यता ही 55 टक्के जाणवत आहे. कोकण व सह्याद्रीच्या पूर्वेकडील मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची सर्वाधिक वातावरणीय संभाव्यता ही 35 टक्के जाणवते. सांगली जिल्हा व लगतच्या परिसरात मात्र सरासरी पेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवते.
✴️ एकंदरीत जून ते सप्टेंबर या चार महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक जाणवते. महाराष्ट्रात कमी पावसाची शक्यता जरी असली तरी जर पडणाऱ्या पावसाचे योग्य वितरण झाल्यास व उपलब्ध पूर्वपाणीसाठा व वेळेत मान्सूनचे आगमन झाल्यास या आधारे कदाचित शेतपिके हंगाम कदाचित जिंकता येऊ शकतो, असेही वाटते.
✴️ महाराष्ट्राबरोबरच लगतच्या गुजरात, दक्षिण मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्यात तसेच उत्तरपूर्व कर्नाटक, दक्षिण आंध्र प्रदेश व तेलंगणाच्या काही भागात ‘टरसाइल’ प्रकारानुसार सरासरी पेक्षा कमी पावसाची शक्यता जाणवते.
✴️ जून महिन्यात महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्र प्रदेशात जून महिन्याच्या सरासरीपेक्षा पावसाची शक्यता असून पावसाच्या ओढीबरोबरच जून महिन्याच्या सरासरी तापमानापेक्षा अधिक तापमान असण्याची सर्वाधिक शक्यताही 55 टक्के जाणवते.
✴️ पाकव्याप्त व उर्वरित काश्मीर, लेह लडाख, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू व पूर्वोत्तरच्या काही राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवते.
✴️ नैऋत्य मान्सून एव्हाना श्रीलंकेच्या मध्यावर याववयास हवा असताना अजूनही अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिणेकडील नानकवरी बेटावरच गेल्या सात दिवसांपासून रेंगाळलेला जाणवत आहे. पुढील दाेन दिवसांत त्याच्या वाटचालीस अनुकूल वातावरणाची शक्यता जाणवते.
✴️ दुसऱ्या पायरीतील मान्सून अंदाजाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या खरीप हंगाम नियोजनासंबंधी माहिती उद्याच्या मेसेजमध्ये दिली जाईल.
✴️ मंगळवार, दि. 30 मे पासून शुक्रवार, दि. 2 जूनपर्यंत चार दिवस मुंबईसह संपूर्ण कोकण व उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवते.
Good Information