Summer heat : मुंबईत पुढील पाच दिवस गरमीमुळे घामटा
1 min read🌞 मंगळवार, दि. 9 मे व बुधवार, दि. 10 मे राेजी मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, या जिल्ह्यातच ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता जाणवते.
🌞 बद्री-केदार पर्यटकांसाठी बुधवार, दि. 10 मे 12 मे या 3 दिवसाच्या स्वच्छ वातावरणानंतर येऊ घातलेल्या नवीन पश्चिमी झंजावातमुळे 13 ते 17 मे असे 5 दिवस तेथील वातावरण काहीसे ढगाळलेले राहून किरकोळ पावसाची शक्यताही जाणवते.
🌞 बंगालच्या उपसागरात मंगळवार, दि. 9 मे राेजी संध्याकाळपर्यंत तीव्र कमी दाबात विकसित होण्याची शक्यता असलेल्या क्षेत्राचे बुधवार, दि. 10 मे ला ‘मोचा’ चक्रीवादळात रुपांतरित होण्याची शक्यता जाणवते. महाराष्ट्राच्या वातावरणावर त्याचा कोणताही परिणाम जाणवणार नाही.
⭐ वारा-खंडितता प्रणाली नामशेष
🌞 अवकाळी पावसाळी वातावरणातून महाराष्ट्राची हळूहळू सुटका हाेत आहे.
🌞 गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रावर अवकाळी पावसासाठी घोंगावणारी वारा-खंडितता प्रणाली संपुष्टात आली असून, बुधवार, दि.10 मेपासून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण पूर्णपणे स्वच्छ होण्याची शक्यता जाणवते. गेल्या तीन दिवसात महाराष्ट्रातील मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता निर्माण झाली हाेती.
🌞 बंगालच्या उपसागरात मंगळवार, दि. 9 मेला विकसनाकडे झेपावणाऱ्या ‘मोचा’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या वातावरणावर कोणताही परिणाम जाणवणार नाही.
🌞 बद्री-केदार पर्यटकांसाठी बुधवार, दि. 10 मेनंतर तेथील वातावरण निवळतीकडे झुकत असून पश्चिम हिमालय चढाईसाठी सध्या तरी ठिक समजावे.