Soil Organic Curb : शेतातील माती जिवंत ठेवण्यासाठी काय करावे?
1 min readआपल्या जमिनीत मूळ मित्र जीवाणू समूह वाढविणे महत्त्वाचे आहे. रोगरोधक उत्पत्तीसाठी पिकांचे सर्व वाण त्याच बरोबर जमिनीच्या इतर घटकांचे प्रमाण, जीवाणूमुळे होणाऱ्या व जीवणूंचे प्रकार या सर्व गोष्टी लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचे ठरते. ज्या पद्धतीने आपण डोळ्याने दिसू शकणाऱ्या घटकांची काळजी घेतो, त्याप्रमाणे आपल्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या मित्र सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणे नितांत गरजेचे आहे. आपल्या शेतात कोणकोणत्या मित्र जीवाणूमुळे मित्र जीवाणू संग्रहाचे संरक्षण होईल, हे पाहणे आपल्यासाठी आवश्यक आहे. मित्र जीवाणू जमिनीत सोडताना त्यांच्या वाढविण्याचा विचार करायला हवा. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
🟢 यासाठी आपल्याला हे करता येईल…
✴️ जमिनीत सर्व पिकांना लागणारा अन्नद्रव्यांचा साठा मुबलक असला तरी, तो पिकांना उपलब्ध स्वरुपात असत नाही. जमिनीमध्ये जीवाणू असल्यास ते आपल्या जीवनचक्रातून पिकाला जमिनीतून किंवा वातावरणातून योग्य वेळी उपलब्ध करून देतात. परिणामी, पांढऱ्या मुळांची संख्या व आकार वाढतो.
✴️ जीवामृताच्या वापराने जमिनीतील जीवाणूंची संख्या मोठ्या पटीत वाढवता येते. त्यांची संख्या वाढल्यामुळे हवेतील नत्र शोषून घेण्याचे प्रमाण वाढते.
✴️ पिकांना नत्र व इतर पूरक अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे शाखीय वाढ जोमदार होते. पीक तजेलदार, टवटवीत व निरोगी दिसतात.
✴️ सेंद्रीय शेती पद्धतीत सेंद्रीय घटकांचा वापर वाढवल्यावर जीवाणूंना खाद्य उपलब्ध होते. ते कुजण्याची प्रक्रिया वेगाने होते. जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढते.
✴️ शेतात गांडुळांची संख्या वाढल्याने जलधारणा क्षमता वाढते. सेंद्रीय पदार्थामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. पावसाच्या खंड काळातही झाडे तग धरू शकतात.
✴️ जीवामृताचा वापर केलेल्या शेतातील भाजीपाला व फळांची प्रत ही सर्वोत्तम मिळू शकते. त्याशिवाय चवही उत्तम होते. साठवण क्षमता चांगली राहत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
✴️ जीवामृताच्या वापरामुळे कमी खर्चात चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते.
🟢 त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात…
✴️ जीवामृत तयार करणे
✴️ बिजामृत तयार करणे
✴️ वेस्ट डिकम्पोझर तयार करणे
✴️ गोकृपाअमृत तयार करणे
✴️ रायझोबियम
✴️ पीएसबी
व ईतरही गोष्टी शेतात तयार करून त्याचा वापर शेतात केल्यास मित्र सूक्ष्मजीव जमिनीत वाढतील व नक्कीच जमीन सुपीक व नरम बनेल. पर्यायाने जमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढेल व जमीन जिवंत राहील