krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Rulers rob the farmers : सत्ताधाऱ्यांनाे, शेतकऱ्यांना आणखी किती लुटाल?

1 min read
Rulers rob the farmers : शेतकऱ्यांचे उत्पन्न 10 पट झाल्याचा दावा केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह ताेमर करतात. परंतु, शेतमालाचे भाव पाडून शेतकऱ्यांना मारण्याचे काम कसे होत आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनाे, शेतकऱ्यांना आणखी किती लुटाल? (Rulers rob the farmers) अशी म्हणण्याची वेळ आली आहे. हे खालील एका गव्हाचे (Wheat) उदाहरण देऊन सिद्ध करीत आहे. हे इतर सर्व पिकांनाही लागू आहे.

❇️ सन 2022- 23 मध्ये महाराष्ट्र सरकारने केंद्राला शिफारस केलेली गव्हाची किमान आधारभूत किंमत (Minimum support price) 3,755 रुपये प्रति क्विंटल होती. पण केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत (MSP) 2,015 रुपये प्रति क्विंटल जाहीर केली. म्हणजे 46.3 टक्के कमी.
स्वामीनाथन शिफारसीप्रमाणे 50 टक्के नफा वाढवायचे तर दूरच राहिले.

❇️ सन 2023 – 24 मध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेला गव्हाचा हमीभाव (MSP) आहे 2,125 रुपये प्रति क्विंटल. म्हणजे इतर शेतीच्या निविष्ठाचे दर, उत्पादन खर्च व महागाई भरमसाठ वाढत असताना दरात फक्त 1.10 रुपये प्रति किलो वाढ केली.

❇️ युक्रेन – रशिया युद्ध (Ukraine-Russia War), रुपयाचे अवमूल्यन (Depreciation of rupee) व आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे गव्हाचे भाव चांगलेच वाढले असताना केंद्र सरकारने गव्हाला निर्यातबंदी (Export ban) घातली व दर पाडले.

❇️ उद्योगपतींना कच्चा माल स्वस्त मिळावा व शहरातील लाडवलेल्या ग्राहकांच्या लांगूनचालनासाठी हे केले.

❇️ काही राज्यांमध्ये निवडणुका (State Election) जवळ आल्यामुळे नुकतेच केंद्र सरकारने त्यांच्याकडील 30 लाख टन गहू 2,150 रुपये प्रति क्विंटलने विक्रीसाठी बाजारामध्ये आणला आहे. त्यामुळे गव्हाचे खुल्या बाजारातील दर 500 रुपयांनी कोसळले.

❇️ सेबीने गव्हासकट इतर आठ शेतमालांवर वायदेबंदी करून अजून भाव पाडले.

❇️ पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना व अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत होणाऱ्या व्यवहारांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळेही शेतमालाचे भाव निच्चांकी होतात.

❇️ दुर्दैव असे की, विरोधी पक्षही महागाई विरुद्ध आंदोलन करताना शेतमालाच्या भावाबद्दल बोलत असतात.

❇️ तुमची महागाईची परिभाषा आहे तरी काय?
सन 1973 मध्ये डिझेल 84 पैसे प्रती लिटर असताना गहू एक रुपया प्रति किलो होता. म्हणजे डिझेलचे भाव 16 टक्क्यांनी कमी होते. आज डिझेल 100 रुपये असताना गव्हाचा हमी भाव 21.25 रुपये प्रति किलो आहे. म्हणजेच आज डिझेलचे भाव गव्हाच्या दराच्या तुलनेत जवळपास पाचपट पटीने वाढले आहेत.

❇️ कुठे आहे शेतमालाची महागाई?
❇️ एकच ध्यास – शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!