krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cotton production decrease : कापसाचे उत्पादन, आवक घटली; तरीही दर दबावात का?

1 min read
Cotton production decrease : सन 2022-23 च्या खरीप हंगामात देशभरात कापसाचे पेरणीक्षेत्र (Sowing area) 10 लाख हेक्टरने वाढून ते 125 लाख हेक्टरवर पाेहाेचले. त्यामुळे देशात कापसाचे उत्पादन (Cotton production) वाढणार असल्याचा अंदाज सीएआय, यूएसडीए यासह अन्य संस्था, अभ्यासक आणि बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केला हाेता. मागील वर्षी कापसाला सरासरी 11,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याने यावर्षी किमान 10,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.वास्तवात, मुसळधार (Heavy) व अतिमुसळधार पाऊस (very heavy rainfal)l, सततचे ढगाळ हवामान (cloudy weather), गुलाबी बाेंडअळीचा (Pink bollworm) प्रादुर्भाव यामुळे कापसाच्या उत्पादनासोबतच बाजारातील आवकमध्ये माेठी घट (Cotton production, arrival decrease) येत आहे. त्यातच कापसाचा वापर (Consumption) व मागणी (Demand) वाढत असताना देशांतर्गत बाजारातील कापसाच्या दरात (Price) वाढ हाेणे अपेक्षित असताना दर मात्र आजही दबावात आहे.

🌍 कापूस उत्पादनाचा अंदाज
सन 2022-23 च्या कापूस वर्षात (1 ऑक्टाेबर ते 30 सप्टेंबर) देशात 375 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज सीएआय (Cotton Association of India)ने तर 362 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज यूएसडीए (United States Department of Agriculture)ने व्यक्त केला हाेता. यावर्षी देशात कापसाचे पेरणीक्षेत्र 10 लाख हेक्टर वाढल्याने उत्पादनात वाढ हाेणार असल्याचा या दाेनही संस्थांचे अनुमान हाेते. परिस्थितीनुरूप या दाेन्ही संस्थांनी त्यांच्या अंदाजात बदल केला. जानेवारी 2023 मध्ये सीएआयने 345 लाख तर यूएसडीएने 339 लाख तसेच फेब्रुवारी 2023 मध्ये सीएआयने 321.50 लाख तर यूएसडीएने 339 लाख गाठींवरून 326.58 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा नवा अंदाज व्यक्त केला. देशात 337.23 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने व्यक्त केला. टेक्सटाईल व गारमेंट इंडस्ट्रीजच्या सूत्रांच्या मते देशात किमान 330 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असून, बाजार तज्ज्ञांच्या मते 290 ते 300 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार आहे. कापूस हंगामाचे आणखी सात महिने शिल्लक आहेत. या काळात दाेन्ही संस्थांसाेबत इतरांचे कापूस उत्पादनाचे आकडे खाली येणारे आहेत.

🌍 कापूस उत्पादन का घटले?
पेरणीक्षेत्र 10 लाख हेक्टरने वाढल्याने कापसाच्या उत्पादनात वाढ हाेणार असल्याचा दावा टेक्सटाईल व गारमेंट इंडस्ट्रीजकडून (Textile and Garment Industries) केला जात आहे. वास्तवात, पंजाब, हरयाणा व राजस्थान या छाेट्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये गुलाबी बाेंडअळीमुळे कापसाचे माेठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची तीव्रता 30 ते 35 टक्के आहे, अशी माहिती पंजाब व हरयाणातील काही शेतकरी व जिनिंग-प्रेसिंग मालकांनी दिली. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व कर्नाटक या माेठ्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये प्रतिकूल व सततचे ढगाळ हवामान व सततचा मुसळधार व अतिमुसळधार पावसामुळे कापसाचे उत्पादन किमान 40 टक्क्यांनी घटल्याची माहिती या राज्यांमधील शेतकऱ्यांनी दिली असून, त्याला बाजार तज्ज्ञांनी दुजाेरा दिला आहे. विशेष म्हणजे, प्रतिकूल हवामान व ऑक्टाेबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम हाेते. महाराष्ट्र व गुजरातच्या काही भागासह (दाेन ते चार जिल्हे) तामिळनाडू व ओडिशा या राज्यांमध्ये कापसाचे उत्पादन समाधानकारक आहे.

🌍 कापसाची आवक घटली
1 ऑक्टाेबर 2021 ते 15 फेब्रुवारी 2022 आणि 1 ऑक्टाेबर 2022 ते 15 फेब्रुवारी 2023 या साडेचार महिन्यांच्या काळातील देशांतर्गत बाजारपेठांमधील कापसाची आवक (Cotton arrival) विचारात घेता मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाची आवक ही 25.65 टक्क्यांनी घटल्याचे स्पष्ट हाेते.1 ऑक्टाेबर 2021 ते 15 फेब्रुवारी 2022 या काळात देशातील बाजारपेठांमध्ये एकूण 194.91 लाख (1,94,91,000) गाठी कापसाची आवक झाली हाेती. 1 ऑक्टाेबर 2022 ते 15 फेब्रुवारी 2023 या काळात कापसाची आवक ही 130.54 लाख (1,30,53,800) गाठींची असून, मागच्या वर्षीच्या तुलनेत ही आवक 64.37 लाख (64,37,200) गाठी म्हणजेच 25.65 टक्के कमी आहे. महाराष्ट्र आणि गुजरात ही दाेन राज्ये देशात सर्वाधिक कापूस उत्पादक राज्ये आहेत. महाराष्ट्रात मागील वर्षी 50.03 लाख (50,03,000) गाठी तर यावर्षी 23.92 लाख (23,92,000) गाठी कापसाची आवक झाली. अर्थात ही आवक 26.11 लाख (26,11,000) गाठींनी म्हणजेच अंदाजे 52 टक्क्यांनी कमी आहे. गुजरातमध्ये मागील वर्षी 51.97 लाख (51,97,500) गाठी तर यावर्षी 40.56 लाख (40,56,000) गाठी कापसाची आयात झाली. मागील वर्षीच्या तुलनेत ही आवक 11.45 लाख (11,45,000) गाठींनी कमी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!