Cotton production : कापसाचे उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न
1 min read
यात जोड ओळ पद्धत अथवा तीन फूट बाय दीड फूट अंतरावर लागवड करून एकरी झाडांची संख्या वाढवायची आहे. आपल्याला अपेक्षित उत्पादन कमीत कमी सुमारे 24 ते 30 क्विंटल मिळवायचे आहे. आपण गेली अनेक वर्षे कापूस लागवड ही पाच बाय दीड फूट अंतरावर करीत आहोत. झाडांची संख्या कमी असल्याने एकरी उत्पादन सुमारे पाच ते आठ क्विंटल मिळवित आहोत. त्यात आपला उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही. म्हणून या नवीन वर्षात कापूस लागवडीचा नवीन प्रयोग सुरू करणार आहे. आपल्याला अति सघन लागवड करून झाडांची संख्या प्रति एकर सुमारे 20 ते 23 हजार एवढी ठेवायची आहे. या अति सघन लागवड पद्धतीतून आपल्याला एकरी 24 ते 30 क्विंटलपर्यंत सहजपणे मिळविता येईल, असा विश्वास वाटतो.


या नवीन प्रयोगात ज्या कापूस उत्पादक शेतकरी मित्रांना सहभागी होण्याची इच्छा आहे, त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. आपल्याला कापूस (EARLY) आगाप लागवड करायची आहे व अति सघन (HIGH DENSITY ) लागवड पद्धत वापरून करायची आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लागवड करावी लागणार आहे. त्यामुळे पाच ते सहा वेचण्या होऊन अपेक्षित कापसाचे उत्पादन सहज मिळविता येईल. माझ्यासोबत या प्रयोगात ज्या कापूस उत्पादक शेतकरी मित्रांना सहभागी व्हायचे असेल, त्यांनी माझ्याशी 20 जानेवारी 2023 पर्यंत संपर्क साधावा. जे आधी सहभाग घेतील त्यांनाच आधी सहभागी करण्यात येईल.
Yas