सावधान! टाेळधाडीने घातली पाकिस्तानात अंडी : भारतात अलर्ट जारी….!!
1 min read🦗 अनुकूल वातावरण
अलीकडच्या काळात वेळीच प्रतिबंधात्मक उपाययाेजना (Preventive measures) केल्या जात असल्याने आशियाई देशांसाेबत आफ्रिकन देशांमधील टाेळ बरीच नियंत्रणात आली आहे. सध्या ही टाेळ पाकिस्तानातील ग्वादर जिल्ह्यात आढळून आली आहे. हा प्रदेश अरबी सागरापासून थाेड्या अंतरावर असल्याने वातावरणातील आर्द्रतेमुळे त्यांना अंडी घालायला अनुकूल वातावरण मिळाले आहे. या टाेळला गट (दल) तयार करण्याच्या अवस्थेत यायला थाेडा वेळ आहे. याच काळात पाकिस्तानसाेबतच ईराणमध्येही (Iran) टाेळ आढळून आली आहे. ईराणमधील टाेळदेखील सध्या सॉलिटरी फॉर्ममध्ये आहे.
🦗 भारतात सर्वेक्षण
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतातील राजस्थान आणि गुजरातच्या टाेळ प्रभावित भागाचे नुकतेच सर्वेक्षण (Survey) करण्यात आले आहे. या सर्वेक्षणादरम्यान भारतात सध्यातरी कुठेही टाेळ अथवा टाेळची अंडी आढळून आलेली नाहीत. सॉलिटरी फॉर्ममधील टाेळ दल तयार करून प्रवास करण्याच्या अवस्थेत राहात नसल्याने या अवस्थेतील टाेळ फारसी नुकसानकारक ठरत नाही. मात्र, यावर्षी मान्सून (Monsoon) थाेडा आधी आल्याने तसेच देशातील काही भागात हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain) बरसायला सुरुवात झाल्याने वातावरणात आर्द्रता निर्माण हाेऊ शकते. आर्द्रतायुक्त वातावरण मिळाल्याने सॉलिटरी फॉर्ममधील हीच टाेळ पुढे दल तयार करून पिकांवर हल्ला करीत नुकसान करण्याची शक्यता अधिक असते. भारतात ही टाेळ जुलैमध्ये किंवा जुलैनंतर दाखल हाेऊ शकते, असेही अभ्यासकांनी सांगितले. या काळात शेतांमध्ये पिके असतात. त्यामुळे पिकांचे नुकसान हाेण्याची शक्यता अधिक असते. मात्र, यावर्षी बहुतांश सर्वच टाेळ प्रभावित देशांनी पूर्वतयारी व प्रतिबंधात्मक उपाययाेजना करायला सुरुवात केल्याने टाेळधाडीपासून पिकांच्या हाेणाऱ्या नुकसानीचा धाेका कमी असेल, असेही त्यांनी सांगितले.
🦗 खाद्य व कृषी संस्थेचे बुलेटीन
संयुक्त राष्ट्र संघाच्या (United Nations) खाद्य व कृषी संस्थेने (FAO-The Food and Agriculture Organization) मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक बुलेटीन (Bulletin) जारी केले हाेते. फेब्रुवारी व मार्चमध्ये पाकिस्तानातील काही भागात टाेळची अंडी आढळून आली हाेती. ही टाेळ आता वयस्क (Mature) झाली आहे. ईराणमध्येही मार्च महिन्यात टाेळचे प्रजनन (Breeding) झाले हाेते. मात्र, या दाेन्ही ठिकाणी टाेळ सध्या सॉलिटरी फॉर्ममध्ये आहे, असे या बुलेटीनमध्ये स्पष्ट केले हाेते.
🦗 टाेळच्या अवस्था
टाेळच्या मुख्यत: सॉलिटरी फॉर्म (Solitary form) व ग्रीगेरियस फॉर्म (Gregorian form) या दाेन प्रमुख अवस्था असतात. सॉलिटरी फॉर्म अवस्थेतील टाेळ सर्वसामान्य किड्यांप्रमाणे असते. या अवस्थेतील टाेळ स्वत:चे पाेट भरण्यासाठी थाेडफार अन्न (Food) खातात. पुढे या टाेळ ग्रीगेरियस फॉर्ममध्ये बदलतात. या अवस्थेत टाेळ माेठ्या समूहाने (Group) फिरतात. एका समूहात हजाराे टाेळ असतात. ग्रीगेरियस फॉर्म अवस्थेतील टाेळ खूप वेगाने आणि माेठ्या प्रमाणात अन्न खाते. या अवस्थेत ही टाेळ आक्रमक प्रवृत्ती (Aggressive tendencies) धारण करून खाण्यासाठी पिके (Crop) व झाडांवर (Tree) अक्षरश: हल्ला (Attack) चढवितात.
🦗 उपाययाेजनांसाठी दाेन देशांची बैठक
भारतीय उपखंडात जून ते नाेव्हेंबर या काळात टाेळधाडीचा धाेका सर्वाधिक असताे. या टाेळधाडींचे नियंत्रण करण्यासाठी काेराेना संक्रमणापूर्वी (मार्च 2020 पूर्वी) भारत आणि पाकिस्तान या दाेन देशांमध्ये नियमित बैठका व्हायच्या. जून ते नाेव्हेंबर महिन्यांच्या दरम्यान दाेन्ही देशांमध्ये किमान दाेन बैठका (Meeting) हाेत असे. यातील पहिली बैठक भारतातील राजस्थानमधील (Rajasthan) बारमेर (Barmer) जिल्ह्यातील मुनाबाव (Munabav) येथे तर दुसरी बैठक पाकिस्तानातील (Pakistan) खोखरापार (Khokhrapar) येथे व्हायची. काेराेना संक्रमण काळात या बैठका ऑनलाईन (Online meeting) झाल्या हाेत्या. या दाेन्ही देशांमध्ये जून महिन्यात बैठक हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानात आढळून आलेली टाेळ सॉलिटरी फॉर्ममध्ये असल्याने तिच्यापासून फारसा धाेका नाही. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययाेजना केल्या जात असल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती जाेधपूर (राजस्थान) येथील लाेकस्ट वाॅर्निंग ऑर्गनायझेशनचे (Locust Warning Organization-LWO) सहायक निदेशक वीरेंद्र कुमार यांनी दिली.
एरवी धाडी पडताना गुप्तता पाळली जाते. अलीकडे सीबीआय, ईडीने तो प्रचलित केला आहे. टोळांशी धाड हा शब्द जोडला गेला आहे.टोळांच्या आक्रमणामुळे धाड हा शब्द इतका चपखल बसला आहे, असे वाटते. वेगात येणाऱ्या टोळांच्या झुंडी उभे पीक उद्ध्वस्त करतात.पूर, अतिवृष्टीसारखे हे संकट नैसर्गिक मानले जात नाही. त्यामुळे नुकसानभरपाईच्या निकषात बसत नाही. चक्रीवादळांचा अंदाज अलीकडे अचूक वर्तवला जातो. त्यानुसार अलर्ट जारी केला जातो. एवढेच नव्हे तर चक्रीवादळांची नावेही आधीच निश्चित होतात. जसे शाहीन, निसर्ग, त्योक्ते, गुलाब. साध्या वादळाने घराचे छप्पर उडून कुणाचा जीव गेला तरी नुकसान भरपाई मिळत नाही..कारण निकषांचा तराजू वेगळा आहे. वावटळीला कसली नुकसान भरपाई.. टोळांनी अंडी दिल्यापासून ही धाड कोणत्या दिशेने प्रवास याचा अनुमान लावला जातो..साधारणतः मध्य प्रदेशात आणि विदर्भाच्या काही भागात टोळ पिके फस्त करतात. यावेळी तशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते….पीक फस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या वाट्याला केवळ तहसीलच्या चकरा येऊ नये एवढीच अपेक्षा ठेवता येईल. हवामानाचा अंदाज पण नुकसान भरपाईचा अंदाज चुकतोच…
अतिशय घातक प्रकार आहे