krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

धनिया पीक : मर रोगावरील उपाय 

1 min read
देगलूरचे (जिल्हा नांदेड) नामदेव रेड्डी म्हणाले, 'पूर्वपार घरापुरता धना (धनिया) पिकवायचो. मागील तीन वर्षापासून व्यावसायिक हेतूने रब्बीत धना पीक घेतोय. बी घरचेच होते. पहिल्या वर्षी (सन 2020) साडेसहा हजार, दुसऱ्या वर्षी (सन 2021) साडेसात हजार, तिसऱ्या वर्षी म्हणजे यंदा (सन 2022) क्विंटलला साडेनऊ हजाराचा रेट भेटला. एकरी सात क्विंटल उत्पादन मिळाले होते. धर्माबाद (जिल्हा नांदेड) मार्केटला माल विकला.'

‘हरभऱ्याच्या तुलनेत चांगलेच पैसे झाले. हरभऱ्यात मर यायला लागली की धना, जवस लावावी असे वाडवडील सांगायचे. ती शिकवण काम पडली. खरोखर चांगले रिजल्ट आले. ज्यांनी तीन वर्षानंतर धनाच्या शेतात हरभरा घेतला, त्यांना यंदा चांगला उतारा मिळाला.'(संपर्क – नामदेव रेड्डी – 8459099193)

🌱 राजस्थान, मध्यप्रदेश व गुजरात ही धना पिकवणारी राज्ये. व्यापारी माहितीनुसार यंदा 20-25 टक्के पीक कमी आलेय. सरकारी अनुमानात गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 टक्के उत्पादन कमी दिसतेय. उत्पादन घटल्याने 12 हजार रुपयांपर्यंत भाव पोहोचले होते. आखाती देश व आग्नेय आशियात धना निर्यात होतो.

🌱 भारतातील धना उत्पादन
❇️ सन 2020 – 7.01 लाख टन
❇️ सन 2021 – 8.91 लाख टन
❇️ सन 2022 – 8.11 लाख टन

🌱 राजस्थानात खासकरून मसाला पिकांखालील क्षेत्र कमी होत आहे. स्थानिक रिपोर्टनुसार मागील तीन वर्षापासून कांद्याखाली क्षेत्र वाढत असल्याने मसाला पिकांकडे दुर्लक्ष झाले.

(सूचना – ही पोस्ट माहितीपर आहे; पुढच्या हंगामात धना पिकाची शिफारस नाही…स्थळ-काळानुसार संदर्भ बदलतात. पोस्टमध्ये पीक बदलानंतरची निरीक्षणे नोंदवली आहेत. अधिक माहितीसाठी नामदेव रेड्डी यांच्याशी संपर्क करावा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!