Southwest monsoon : दाेन दिवसांत नैऋत्य मान्सून निरोप घेणार!
1 min read
Southwest monsoon : नैऋत्य मान्सूनने (Southwest monsoon) साेमवारी (दि. 13 ऑक्टाेबर) त्याच्या परतीच्या प्रवासात (Return journey) पुढील मजल गाठून आता केवळ तेलंगणा, छत्तीसगड व ओडिशा या तीन राज्यातून त्याला बाहेर पडावयाचे आहे. मान्सूनची साेमवारीची सीमा रेषा कर्नाटकातील कारवार, कलबुर्गी, तेलंगणातील निझामाबाद, छत्तीसगडमधील कांकेर व चांदबली या शहरातून जात आहे. देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी 95 टक्के भागातून मान्सून परतलेला आहे. दरवर्षी मान्सून साधारणत: देशातून सरासरी 15 ऑक्टोबरच्या दरम्यान बाहेर पडतो. येत्या दोन दिवसात देशाच्या उर्वरित 5 टक्के भूभागावरून आपला पाय काढता घेईल, असे वाटते.
🌀 ईशान्य (हिवाळी) मान्सूनची सुरुवात कधी होणार?
येत्या दाेन दिवसांत नैऋत्य मान्सून निरोप घेताच, देशाच्या दक्षिणेतील राज्यात ईशान्य (हिवाळी) मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता जाणवते.
🌀 उर्वरित ऑक्टोबरमधील पावसाची स्थिती
अजून ऑक्टोबरचा अर्धा महिना शिल्लक असून या अर्ध्या महिन्यात, पावसाच्या शेवटच्या दोन आवर्तनातून महाराष्ट्रात रब्बीला लाभदायक ठरेल, अशा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जाणवते. बुधवार (दि. 15 ऑक्टोबर) ते सोमवार (दि. 20 ऑक्टोबर) नरक चतुर्दशी दरम्यानच्या सहा दिवसात महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील. राज्यातील भाग बदलत तुरळक ठिकाणी मध्यम ते किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. त्यातही बुधवार-गुरुवार (दि. 15-16 ऑक्टोबर) या दोन दिवशी पावसाचा प्रभाव अधिक जाणवेल.
🌀 ऑक्टोबरमधील जिल्हानिहाय पावसाची स्थिती
🔆 बुधवार (दि. 15 ऑक्टोबर) – चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, जालना, बीड, लातूर, धाराशिव, पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर.
🔆 गुरुवार (दि. 16 ऑक्टोबर) – जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पश्चिम छत्रपती संभाजीनगर, पूर्व अमरावती, बुलढाणा, अकोला, सह्याद्री घाटमाथा तसेच रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग.
🔆 शुक्रवार (दि. 17 ऑक्टोबर) – बुलढाणा, धुळे, नाशिक, सह्याद्री घाटमाथा, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर व हिंगोली.
🔆 शनिवार (दि. 18 ऑक्टोबर) – सह्याद्री घाटमाथा, अहिल्यानगर, सोलापूर, नांदेड, लातूर, बीड व धाराशिव.
🔆 रविवार-सोमवार (दि. 19-20 ऑक्टोबर) – सह्याद्री घाटमाथा, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, नांदेड, परभणी, अकोला, चंद्रपूर व गडचिरोली.
🔆 मंगळवार (दि. 21 ऑक्टोबर) – मुंबईसह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ.