krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Rainfall and crops in August : ऑगस्टमधील पाऊस आणि पिके

1 min read

????????????????????????????????????

Rainfall and crops in August : ऑगस्ट ( August) महिना सुरू झाला आहे. या महिन्या पावसाची (Rainfall) काय स्थिती असेल, पिकांची (crops) अवस्था कशी असेल, याबाबत थाेडं जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

संपूर्ण ऑगस्ट महिन्यातील पावसाची स्थिती
❇️ या महिन्यात राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव, लातूर व नागपूर या नऊ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक (106 टक्के व अधिक) पावसाच्या शक्यता आहे.
❇️ राज्यातील नंदुरबार, जळगाव, जालना, बीड, नांदेड, परभणी, जालना व भंडारा या आठ जिल्ह्यांमध्ये सरासरीइतक्या (96 ते 104 टक्के) पावसाची शक्यता आहे.
❇️ धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सांगली, तसेच संपूर्ण विदर्भ (भंडारा व नागपूर वगळता) आणि कोकणातील पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर व रायगड या 19 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी (90 ते 95 टक्के) पावसाची शक्यता आहे.

ऑगस्टमधील धरणांची स्थिती
ऑगस्टमध्ये पाऊस पुन्हा घाटमाथ्यावरच अधिक कोसळणार आहे. त्यामुळे पुणे, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांमधील सह्याद्रीच्या कुशीतील सर्व धरणे 100 टक्के भरून ओसंडून वाहतील. गोदावरी खोऱ्यातील यापुढील सर्व जलस्रोतांचे प्रवाह (रन-ऑफ रेन वॉटर – Run-off rain water) हे आता जायकवाडीच्या उदरातच विसावेल. त्यामुळे महाराष्ट्रातील जायकवाडीसह इतर सर्व मोठे जल प्रकल्प लवकरच भरून नद्यांचे प्रवाह देखील खळाळतील.

⭐ येत्या दोन दिवसातील पावसाची स्थिती
गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनच्या सक्रियतेनंतर रविवार (दि. 4 ऑगस्ट) आज व साेमवार (दि. 5 ऑगस्ट) महाराष्ट्रात भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत ओढ दिलेल्या पर्जन्यच्छायेतील प्रदेशातही समाधानकारक पावसाची अपेक्षा करायला हरकत नाही. मंगळवार (दि. 6 ऑगस्ट)पासून मात्र कोकण व विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता जाणवते. मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसाचा जोर कायम टिकून राहण्याची शक्यता आहे.

सध्याच्या तीन दिवसातील पाऊस कशामुळे?
❇️ सध्या अरबी समुद्रात विशेषतः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर सम हवेचा दाब जोडणाऱ्या प्रत्येक दोन सम-तल रेषा (आयसोबार्स – Isobars) मधील कमी झालेल्या अंतरामुळे हवेच्या दाबाचा ढाळ खोल झाला आहे. म्हणजेच प्रत्येक दोन आयसोबारमधील अंतर कमी होवून प्रेशर ग्रेडिएन्ट (Pressure gradient) बळकट झाला आहे. परिणामी आपोआपच समुद्र सपाटीपासून दीड किमी हवेच्या जाडीत सोमालिया जेटच्या पश्चिमी मान्सूनी वाऱ्यांचा वेग ताशी 35 ते 75 किमी पर्यंत वाढून कोकण किनारपट्टीवर आदळत आहे.
❇️ सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर असलेला वर स्पष्टीत बळकट प्रेशर ग्रेडिएन्टचा (उलटा) द्रोणीय आसही घाटमाथ्यावर पाऊस देत आहे.

खरीप पिके
वर स्पष्टीत सरासरीपेक्षा कमी (90 ते 95 टक्के) पावसाच्या शक्यतेतील महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यात ऐन दाणा-भरणीत आलेल्या खरीप पिकांना ऑगस्टमध्ये पावसाचा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, या 19 जिल्ह्यातील कमी पावसाच्या शक्यतेतही पावसाचे वितरण जर समान झाले म्हणजे पावसाळी दिवसाची संख्या ऑगस्टमध्ये जर वाढली तर पिकांना दिलासा मिळू शकतो. विशेषतः अहमदनगर, नगर नाशिक व छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यांत पावसाची परिस्थिती जैसे थेच राहण्याची शक्यता जाणवते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!