krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cold, Rainy Weather : थंडी, पावसाच्या मिश्र वातावरणाचा फेब्रुवारी महिना

1 min read
Cold, Rainy Weather : यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या मासिक अंदाजानुसार संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक असण्याच्या शक्यतेमुळे चालू फेब्रुवारी महिन्यात थंडीचे (Cold) प्रमाणही दरवर्षीच्या सरासरी थंडीपेक्षा कमी जाणवेल. कोकण व उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान या महिन्यात सरासरी इतके तर कोकण व उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक राहील. म्हणजे दिवसाचा ऊबदारपणा नेहमीसारखाच जाणवेल. थंडीच्या लाटेची शक्यता मात्र नाही. चालू आठवड्यात महाराष्ट्रात सुरुवातीला काहीशी थंडी जाणवेल. मात्र त्यानंतर थंडी कमी जाणवेल.

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीचा कालावधी हा थंडीचा व साधारण शेवटचा आठवडा हा थंडी कमी होण्याचा कालावधी असतो. पावसाची (Rain) मासिक सरासरी या महिन्यात अगदी नगण्य असते. तरी देखील या महिन्यात पावसासंबंधी भाष्य करताना, यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या मासिक अंदाजानुसार महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सोलापूर व सोलापूर हे सात जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता दर्शवते. परभणी, नांदेड, हिंगोली वाशिम, यवतमाळ या पाच जिल्ह्यात व लगतच्या परिसरात तर ही शक्यता अधिक जाणवते. कोकणातील वर स्पष्टीत सात जिल्ह्यात मात्र ही शक्यता सरासरीपेक्षा खूपच कमी जाणवते. ‘एल-निनो’मुळे पुढील आठवड्यात येणारे थंडीचे आवर्तनही ठरू शकते शेवटचेच.

लागोपाठ येणाऱ्या पश्चिमी झंजावातातून तसेच 28 ते 30 डिग्री अक्षवृत्त दरम्यान उत्तर भारतात 12 किमी उंचीवरील तपाम्बरच्या पातळीतील ताशी 270 ते 300 किमी वेगाने वाहणाऱ्या पश्चिमी वाऱ्याच्या झोतामुळे अशा एकत्रित घडून आलेल्या घडामोडीमुळे महाराष्ट्राला 1 फेब्रुवारीपर्यंत माफक पण थंडी अनुभवावयास मिळाली. दिवसाचे कमाल तापमानही सरासरीपेक्षा कमीच राहिले. त्यामुळे दिवसाचा ऊबदारपणाही कमी राहून थंडीस मिळण्यास मदत मिळाली.

पुढील तीन दिवस म्हणजे 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान कमाल व किमान तापमानात वाढ होवून थंडी काहीशी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली हाेती. खानदेशातील नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेकडील परीक्षेत्रात या तीन दिवसात काहीसे ढगाळ वातावरण हाेते.

येत्या दोन दिवसात पश्चिम हिमालयीन क्षेत्रात पुन्हा नवीन येऊ घातलेल्या पश्चिमी झंजावाताच्या परिणामातून सोमवार (दि. 5 फेब्रुवारी) ते रविवार (दि. 11 फेब्रुवारी)पर्यंतच्या संपूर्ण आठवडाभर कमाल व किमान तापमानाचा पारा घसरून महाराष्ट्रात पुन्हा चांगलीच थंडी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, हिवाळी हंगामासाठीचे कदाचित हे शेवटचे थंडीचे आवर्तन ठरण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!