Pink bollworm Management : कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन
1 min read
🔆 सर्वप्रथम शेतातील कपाशीचे पीक 40 ते 45 दिवसांचे असताना कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या सनियंत्रणासाठी हेक्टरी पाच म्हणजेच एकरी दोन कामगंध सापळे, गॉसिलूर या कामगंध गोळीसह कपाशीच्या पिकात लावावे. या कामगंध सापळ्यांमध्ये सतत दोन ते तीन दिवस सरासरी आठ ते दहा गुलाबी बोंडअळीचे नर पतंग सापळ्यात आढळून आल्यास मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचे पतंग सापळ्यात अडकवून गुलाबी बोंडअळीचे पुढच्या पिढीचे प्रजनन थांबवण्याकरिता म्हणजेच मास ट्रॅपिंग हेक्टरी 15 ते 20 म्हणजेच एकरी सहा ते आठ कामगंध सापळे कपाशीच्या शेतात लावावे.
🔆 कपाशीच्या शेतामध्ये डोमकळ्या म्हणजेच गुलाबाच्या न उमललेल्या कळीप्रमाणे फुले आढळून आल्यास अशा कपाशीच्या शेतामधील डोमकळ्या शोधून अळीसह अशा डोमकळ्यांचा नाश करावा.
🔆 कपाशीच्या पिकात नत्र युक्त खताचा व संजीवकाचा अतिरिक्त, अवाजवी व अशीफारशीत वापर टाळावा.
🔆 पीक उगवणीनंतर साधारणत: 35 ते 40 दिवसांनी कपाशीच्या पिकात 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडिरेक्टिन 3000 PPM 40 मिली अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन 15 दिवसांच्या अंतराने एक किंवा दोन फवारण्या कराव्यात.
🔆 पीक उगवणीनंतर 50 ते 60 दिवसांनी ट्रायकोग्रामा चिलोणीस किंवा ट्रायकोग्रामा बॅक्टरी या मित्र कीटकाची हेक्टरी 1.5 लाख अंडी प्रति हेक्टर या प्रमाणात दर 12 ते 15 दिवसांच्या अंतराने कपाशीच्या शेतामध्ये पानाच्या मागच्या बाजूने टाचून लावावी.
🔆 कपाशीच्या पिकामध्ये फुलांमध्ये 5 टक्क्यांपर्यंत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मिली अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. जर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव 5 ते 10 टक्क्यांच्या दरम्यान आढळून आला तर क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मिली किंवा प्रोफेनोफोस 50 टक्के प्रवाही 30 मिली किंवा Indoxicarb 15.8 प्रवाही 10 मिली अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
🔆 ज्या ठिकाणी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव 10 टक्क्यांच्या वर आढळून आला असेल अशा ठिकाणी Chlorantraniliprole 9.3% आधिक Lambda Cylohathrine 4.6 टक्के या मिश्र कीटकनाशकाची 5 मिली किंवा Indoxicarb 14.5% अधिक Acetamapride 7.7 टक्के 10 मिली अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची आवश्यकतेनुसार फवारणी करा.
कीटकनाशकांची व्यापारी नावे
✳️ Thiodicarb 75 %wp 20gm (व्यापारी नाव :- Larvin/Amnon)
✳️ Lymbda – Cyhalothrin 5% Ec 6ml. (व्यापारी नाव :- Karate/Reeva/Jayam)
✳️ Cypermethrin 25 % Ec 4ml (व्यापारी नाव :- Cymbush/Superkiller)
✳️ Fenvelerate 20 % Ec 8ml (व्यापारी नाव :- Tatafen/Fenval)
✳️ Profenophos 40 % + Cypermethrin 4 % Ec 10ml (व्यापारी नाव :- Profexsuper/Polytrin-c/Roket)
✳️ Thiamethoxam 12.6 % + Lymbda – Cyhalothrin 9.5 % Ec 4ml (व्यापारी नाव :- Alika/Anolik/Iruka)
✳️ Imamectin Benzoate 5 % Sg 4 gram (व्यापारी नाव :-Missile/Proclaim/Em-1)
✳️ Spinosad 45 % sc 4ml (व्यापारी नाव :- Tracer/Spinter)
✳️ Clorantaniliprole 18.5 % SC 3 ml (व्यापारी नाव :- Coragen/Formax/Helipro)
टीप : ❇️ कोणतीही रसायने फवारण्यापूर्वी लेबल क्लेम शिफारशीचा संदर्भ घेऊन लेबल क्लेम शिफारशी प्रमाणेच रसायने फवारणी करावी.
❇️ रसायने फवारणी करताना सुरक्षित कीडनाशक फवारणी तंत्राचा अंगिकार करावा. अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी टाळावी व प्रमाण पाळावे
❇️ रसायने वापरण्यापूर्वी प्रत्यक्ष तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य निदान करून लेबल क्लेम शिफारशीप्रमाणेच वापरणे गरजेचे आहे.
(❇️ संदर्भ : डॉ. डी. बी. उंदीरवाडे, विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या सल्ल्यानुसार.)
Online available sir
thanks