Laptop Import ban : शेतमालाच्या निर्यातीवर तर लॅपटॉपच्या आयातीवर बंदी!
1 min read🔆 Reliance Jio ने 5 हजारला विकला जाणारा JioBook 16 हजार रुपयाला मार्केटमध्ये विकायला आणला. लोकांना स्वस्तातला त्या सेगमेंट मधला लॅपटॉप मिळू नये म्हणून त्या सेगमेंटच्या लॅपटॉप आयातीवरच केंद्र सरकारने बंदी घातली.
🔆 टाटा, महिंद्राच्या इलेक्ट्रिक कारला मागणी वाढावी म्हणून BYD चा 1 बिलियन डॉलरचा भारतातल्या megha इंजिनीरिंग बरोबरीचा चांगला प्रोजेक्ट सुरक्षेच्या नावाखाली सरकारने बॅन केला.
🔆 50 रुपये किलो उत्पादन खर्च असलेला टोमॅटो 100 रुपये विकला जाऊ लागले म्हणून सरकारने शेजारील नेपाळकडून टोमॅटोची आयात सुरुवात केली.
🔆 20 रुपये किलो उत्पादन खर्च असलेला कांदा 22 रुपये विकला जाऊ लागला म्हणून नाफेडकडे असलेला कांदा सरकार बाजारात उतरवण्याची तयारी करत आहे.
🔆 अंबानी, टाटा आणि इतरांची ताकत आहे. पैसा, त्याच्यावरच हे सरकार manage करतात. तुमचा शेतमालाचा भाव वाढला म्हणजे, टाटा, अंबानी आणि इतरांच्या आदीच नफेखोर वृत्तीमुळे वाढलेल्या शहरी महागाईत भर पडते. त्यामुळे कांदा चार हजार जरी झाला तरी हे उद्योजक मीडियाला, विरोधकांना पैसा पुरवून त्याच भांडवल करतात आणि सरकारला कांदा किंवा इतर शेतमाल निर्यात बंदी करण्यास भाग पडतात, गरज पडल्यास आयात करतात आणि शेवटी भाव पडतात.
🔆 कांद्याला कायमस्वरूपी चांगला भाव मिळवण्यासाठी यांना उत्तर एकच, भारत दिघोळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणं आणि गरज पडल्यास आंदोलन करत राहणं. जो पण सत्ताधारी आणि विरोधक कांद्याच्या भावाबद्दल गैरसमज पसरवले त्याला फोन करून सांगा की तुझ्या पक्षाच्या उमेदवाराला मत तर देणाराच नाही, परंतु निवडणुकीत शेवटचे पंधरा दिवस प्रत्येक नातेवाईकाच्या घरी जाऊन सांगेल की, या पक्षाला किंवा उमेदवारला मत करू नकोस म्हणून तेव्हाच हे बॅकफूट वर जातील आणि कांद्याच्या भावाचा भांडवल करणार नाहीत.
🔆 जर सरकारने नाफेडचा कांदा बाजारात आणला नाही आणि आयात नाही केला तर सप्टेंबरपर्यंत 6 ते 7 हजार रुपयांपर्यंत कांदा विकला जाऊ शकतो. भविष्यात तोच भाव कायम ठेवण्यासाठी दिघोळे साहेबांच्या मार्गदर्शन खाली कांदा मार्केटमध्ये टप्प्याटप्प्याने आणत जा आणि सरकार वर टाटा, अंबानी पेक्षा जास्त दबाव वाढवा, म्हणजे टाटा, अंबानी च्या वस्तूंचे भाव कमी होतील आणि तुमच्या कांद्याचे वाढतील.
🔆 दिघोळे साहेब आपल्या दूरदृष्टी आणि नियोजनामुळे आज किमान शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च तरी निघत आहे आणि त्यामुळे बऱ्याच संभाव्य होणाऱ्या आत्महत्या आपण थांबवल्या आणि नाफेड पण आता तुम्हाला घाबरत आहे.