Cotton crop disease : कपाशीवरील आकस्मिक मर रोग व्यवस्थापन
1 min readही समस्या मुळांच्या कार्यरत राहाण्याशी निगडीत आहे. दिवसाचे तापमान 40 अंश सेंटीग्रेडच्या वर दीर्घकाळ राहिल्यास कपाशीच्या झाडांची पांढरी मुळे जमिनीतील अन्नद्रव्ये शोषण करू शकत नाही. त्यामुळे झाडांची पाने पिवळसर होऊन मलूल होतात. पाने व खोड लालसर होतात. पाणी पिकात दीर्घकाळ साचून राहिल्यावर मुळांना हवा नसल्याने पांढरी मुळे पाणी आणि अन्नद्रव्यांचे शोषण करू शकत नाहीत. त्यामुळे कपाशीचे झाड मलूल होऊन वरून सुकत येते.
❇️ जमिनीतील वाढलेल्या तापमानामुळे झाडांची पांढरी मुळे अन्नद्रव्यांचे शोषण करू शकत नाही.
पाण्याचा ताण पडल्यास करावयाच्या उपाययोजना
🔆 जमिनीत वाफसा अवस्था आणावी. एवढाच वेळ ठिबक सिंचनाने सिंचन करावे.
🔆 आकस्मिक मर रोगग्रस्त पिकाची मुळे उत्तमरित्या कार्यरत होण्याकरीता ह्यूमिक ऍसिडचे ड्रेंचिंग करावे. ठिबकमधून एकरी 1.5 लिटर ह्युमिक ऍसिड सोडावे.
कापूस पिकावर विद्राव्य खत 19:19:19 – 45 ग्राम + प्लैंटोझाईम / बायोझाईम 30 मिली + स्टिकर 10 मिलि मिसळून फवारणी करावी.
🔆 कापूस पिकासाठी नियमित फर्टीगेशन करावे. ठिबक सिंचनाद्वारे युरिया 3 किलो + 12:61:00 – 2 किलो + पांढरे पोटॅश – 1 किलो प्रती एकर आठवड्यातून 2 वेळा फर्टीगेशन करावे.
🔆 आकस्मिक मर रोगग्रस्त झाडांना कॉपर ऑक्सीक्लोराईड 2 ग्राम किंवा कार्बनडेझीम 1 ग्राम प्रती लिटर पाण्यात विरघळून 100 मिलि मुळांजवळ ड्रेंचिंग करावे.
🔆 मुळांजवळ खतांचे द्रावण टाकावे – 1.5 किलो युरिया + 1.5 किलो पोटॅश 100 लिटर पाण्यात विरघळून द्रावण तयार करून रोगग्रस्त झाडांच्या मुळांजवळ 124 मिलि द्रावण टाकावे, ड्रेंचिंग करावे.
फर्टीगेशन रेग्यूलर करावे.
🔆 सध्या सर्वत्र पाऊस चांगला होत आहे. शेतात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. पाण्याचा त्वरीत निचरा करावा.