Monsoon : मान्सूनची मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सलामी
1 min read✴️ बळकट व ताकदवान अशा पश्चिमी मान्सूनी समुद्री वारे, कोकण ओलाचिंब करीत सह्याद्री ओलांडून पुढे वाटचाल केल्यामुळे रविवार (दि. 25 जून)पासून पुढील 5 दिवस म्हणजे गुरुवार (दि. 29 जून)पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची (Rain) शक्यता आहे.
✴️ विशेषतः सह्याद्री घाटमाथा धरण क्षेत्र जलसंवर्धन करणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यातही जोरदार पावसामुळे प्राथमिक अवस्थेत का होईना नद्या वाहतवनी होवून सुरुवातीची काहीशी जलसंजीवनी त्यांना प्राप्त व्हावी, अशी अपेक्षा करू या!
✴️ शुष्क वातावरणातून पावसाळी वातावरणातील बदल शेतकऱ्यांची मानसिकताही बदलवतो. ‘पाऊस सुरू झाला’, ‘आता तो असाच पडेल’. ‘नंतरही पडेल’, अशा कल्पनांच्या गृहीतकावर घाने पेर उरकवली जाते. पण, इतके दिवस पावसाने थांबवलेच होते तर, अजून एक आठवडा वाट बघून, 6 जुलैनंतर पूर्ण ओलीवरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी.
✴️ ‘आयओडी’ने (Indian Ocean Dipole) पावसासाठी काय मदत करायची ती करू दे, पण ‘एल-निनो’चे (El Nino) वर्ष आहे, हंगाम पूर्ण होईपर्यंत त्याचा विसर पडूच नये.
🌐 पावसाचा जोर, मान्सूनच्या सध्याच्या अनुकूल अवस्था व वातावरणीय प्रणाल्या
✳️ अरबी समुद्रात कर्नाटक ते महाराष्ट्र अर्ध पश्चिम किनारपट्टीलगत तटीय हवेच्या कमी दाबाच्या द्रोणीय ‘आसा’मुळे
✳️ महाराष्ट्र पश्चिम किनारपट्टीवर आदळणाऱ्या पश्चिमी मान्सूनी समुद्री वाऱ्यामुळे
✳️ गुजरात-महाराष्ट्र लगतच्या अरबी समुद्र उत्तर किनारपट्टीवर बेचक्यात साडेतीन ते सहा किमी उंचीवरील चक्रीय वाऱ्यामुळे
✳️ बंगाल-ओडिशा पूर्व किनारपट्टीलगत बंगालच्या उपसागरात हवेचे मान्सूनी कमी दाब क्षेत्र निर्मितीमुळे साडेसात किमी उंचीपर्यंत चक्रीय वाऱ्यामुळे
✳️ बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र ते पंजाबपर्यंत एक किमी उंचीपर्यंत पसरलेला पूर्व-पश्चिम हवेच्या कमी दाबाचा ‘आस’मुळे मान्सून दोन्ही शाखांसहित एकत्रित पुढे झेपावेल.
✳️ यातील बंगाल-ओडिशा पूर्व किनारपट्टीलगत बंगालच्या उपसागरात हवेचे मान्सूनी कमी दाब क्षेत्र निर्मितीमुळे साडेसात किमी उंचीपर्यंत चक्रीय वाऱ्यामुळे ही प्रणाली पुढील काही दिवस महाराष्ट्राला पावसासाठी अधिक अनुकूल ठरणार आहे.