Freedom : स्वातंत्र्य काय आहे?
1 min readजीवन हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे जीवन जगण्याकरता त्यातल्या त्यात चांगल्या प्रतीचे जीवन जगण्याकरिता माणसाची नेहमीची रोजची धडपड चालू असते.
अनेकांना स्वातंत्र्य ही संकल्पना अमूर्त वाटत राहते खोलात जाऊन विचार केल्यास स्वातंत्र्य ही संकल्पना अमूर्त नसून, ती वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे. ती अनुभवण्याची गोष्ट आहे. ही नाममात्र अमूर्त असती तर तिला कायद्याच्या पुस्तकात स्थान मिळाले असते का? असा स्वतःला प्रश्न विचारून पाहावा म्हणजे लक्षात येईल.
शेतकरी ,उद्योजक, प्रतिभावंत, संशोधक, तंत्रज्ञ, व्यापारी, वाहतूकदार, कष्टकरी, साहित्यिक हे खरे घटक खऱ्या अर्थाने राष्ट्राची उभारणी करण्याचे काम करत असतात. त्यांच्या बुद्धिमत्तेचा जोरावर आणि कष्टकऱ्यांच्या कष्टावर व शेतकऱ्यांनी गाळलेल्या घामावर खऱ्या अर्थाने समाज व्यवस्थेचा डोलारा उभा असतो. ही सर्व मंडळी पंचमहाभूतांचा योग्य असा समन्वय करून त्याचे संपत्तीत रूपांतरित करतात त्या संपत्तीचे भांडवलात पुन्हा रुपांतरित करतात श्रम आणि भांडवल यांच्या प्रक्रियेतून पुन्हा बचत तयार होते .हे उद्योजक आपल्या क्षमतांचा वापर करून धोका पत्करून धाडस करून समाजाला आणि देशाला वस्तू आणि सेवा यांचा पुरवठा करतात.
समाजाची आर्थिक घडी बसवण्याचे काम करतात समाजाचा गाडा सुरळीत चालविण्यासाठी या सर्व लोकांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. मी जर असं म्हटलं की, स्वातंत्र्य म्हणजेच उद्योजकता उद्योजक हाच पोशिंदा असतो. या पोशिंदा त्यांच्या प्रयत्नाला अडथळा निर्माण करणे म्हणजेच स्वातंत्र्याचे संकोच करणे होय. अशी स्वातंत्र्याची पुन्हा एक व्याख्या करता येईल. समाजातील व्यक्ती व्यक्ती तील सहज होणाऱ्या देवाण-घेवाण कोणाचाही हस्तक्षेप ठेवण्यात आलेला नाही, अशा व्यवहाराचे स्वातंत्र्य बहाल करण्यात आले आहे, अशा व्यवहारांशी राजसत्तेची पूर्णपणे फारकत करण्यात आली आहे. उद्योग किंवा व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य असल्यामुळे पूर्ण आर्थिक स्वातंत्र्य बहाल करण्यात आले. इंग्रजी राजवटीमध्ये होती, ती पूर्णपणे काढून टाकण्यात आली. एवढेच नव्हे तर, त्यावर बंधने टाकली होती. ती सुद्धा काढून टाकण्यात आली सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात न्याय मागण्याची सोय करण्यात आली.
शेतकरी आंदोलनाचे नेते श्री शरद जोशी यांनी स्वातंत्र्याची मूल्ये या लेखात कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या एका कवितेचा उल्लेख केला आहे. त्यात त्यांनी स्वातंत्र्याची कल्पना स्पष्ट केलेली आहे ते म्हणतात.
मने निर्भय असतील
आणि मान ताठ असेल
जगांचे कप्पे कप्पे पाडणार्या
शूद्र भिंती कोसळल्या असतील.
शब्द सांगतील फक्त सत्यच व
अथक प्रयत्न पराकाष्टा करतील
परिपूर्ण त्याला स्पर्श करण्यासाठी व
विचारांचा शुद्ध प्रवाह
सवयीच्या वाळवंटात जिरणार नाही
मने झेपावतील
सतत रूदावणार्या
विचार आणि कार्य
यांच्याशी तिच्याकडे….
यात कवी रवींद्रनाथ टागोर यांनी स्वातंत्र्याची व्याख्या करताना जगाचे कप्पे पाडणारा शूद्र भिंती कोसळल्या जातील असे लिहून ठेवले. याचा अर्थ असा की, विचार सेवा आणि वस्तू यांच्या देवाणघेवाणीवर कोणतेही बंधन असता कामा नये ही स्वातंत्र्याची महत्त्वाची आहे ही बाब येथे स्पष्ट होते.