krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Heavy rains, rotten crops : अतिमुसळधार पाऊस, सडलेली पिके आणि ओला दुष्काळ!

1 min read
Heavy rains, rotten crops : महाराष्ट्रात अति पावसामुळे (Heavy rain) बहुतांश सर्वच पिके सडली (Crop rotten) असून, फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यातील मुंबई महानगर व उपनगरासह सर्वच म्हणजे 34 जिल्ह्यांमधील 1 जून ते 30 सप्टेंबर या काळातील पावसाची सरासरी 1,299.6 मिमी असताना सरासरी 1,525.125 मिमी आणि 1 ते 18 ऑक्टाेबर या काळातील पावसाची सरासरी 62.725 मिमी असताना सरासरी 116.525 मिमी पाऊस काेसळला. यावर्षी संपूर्ण राज्यभर सरासरीपेक्षा 52 ते 94 टक्के अधिक पर्जन्यमान झाले. त्याचे परिणाम ग्रामीण भागात स्पष्ट दिसून येत आहे. या पावसामुळे 1 जून ते 17 ऑक्टाेबर या काळात राज्यातील 35.22 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. असे असताना 'राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही' असे वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री श्री अब्दुल सत्तार यांनी केले. हे कितपत याेग्य आहे?

🌍 35.22 लाख हेक्टरपेक्षा अधिक नुकसान
राज्यात 1 जून ते 17 ऑक्टाेबर या काळात काेसळलेल्या मुसळधार, अतिमुसळधार पाऊस व पुरामुळे 34 जिल्ह्यांमधील 38,44,826 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या 35,21,868.49 हेक्टरमधील विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या पावसाचा सर्वाधिक फटका कापूस व साेयाबीनच्या पिकाला बसला असून, धान (भात), तूर, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, हळद या प्रमुख पिकांसाेबतच संत्रा, माेसंबी, केळी व इतर फळपिकांचे तसेच भाजीपाल्याच्या पिकांचे माेठे नुकसान झाले. त्यानंतर 19 व 20 ऑक्टाेबर राेजी काेसळलेल्या पावसामुळे 22 जिल्ह्यातील तर 21 व 22 ऑक्टाेबरच्या मुसळधार पावसामुळे काेल्हापूरसह इतर जिल्ह्यातील िपकांचे प्रचंड नुकसान झाले. पूर व पाणी तुंबून राहिल्याने या जिल्ह्यांमधील हजाराे हेक्टरमधील पिके पाण्याखाली बुडाली. 18 ऑक्टाेबरनंतरच्या नुकसानीचे मात्र सर्वेक्षण करण्यात आले नाही. त्यामुळे नुकसानीचा आकडा 35.22 लाख हेक्टरपेक्षा निश्चितच अधिक आहे.

🌍 4,634.46 काेटी रुपयांची मागणी
1 जून ते 31 ऑगस्ट या काळातील नुकसानीची भरपाई देण्यासाठी कृषी विभागाने राज्य सरकारकडे 4,634.46 काेटी रुपयांची मागणी केली आहे. 1 सप्टेंबर ते 22 ऑक्टाेबर दरम्यान पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी आणखी किती निधी लागणार आहे, हे मात्र कृषी विभागाने स्पष्ट केले नाही. शेतकऱ्यांचे लाखाे रुपयांचे नुकसान हाेऊन त्यांना राज्य सरकारकडून उपकार केल्यागत तुटपुंजी आर्थिक मदत केली जाणार आहे.

🌍 जिल्हा – नुकसान (हेक्टर) – नुकसानग्रस्त शेतकरी – अपेक्षित नुकसान भरपाई (लाख रुपये)
✳️ ठाणे – 71.64 – 507 – 10.16
✳️ पालघर – 281.22 – 1,132 – 38.24
✳️ रायगड – 1,583.60 – 4,073 – 205.62
✳️ रत्नागिरी – 44.46 – 114 – 7.90
✳️ सिंधुदुर्ग – 65.32 – 63 – 2.20
✳️ नाशिक – 28,585.62 – 18,467 – 1,124.00
✳️ धुळे – 49,054.65 – 4,497 – 339.51
✳️ नंदुरबार – 264.23 – 877 – 35.04
✳️ जळगाव – 19,950.92 – 11,424 – 1,906.04
✳️ अहमदनगर – 47,664.50 – 21,410 – 425.90
✳️ पुणे – 8,557.35 – 9,192 – 318.44
✳️ साेलापूर – 1,46,790.30 – 1,41,930 – 14,755.59
✳️ सातारा – 119.85 – 982 – 28.45
✳️ सांगली – 2,011.70 – 1,201 – 107.78
✳️ काेल्हापूर – 1,789.80 – 5,674 – 162.49
✳️ औरंगाबाद – 16,362.00 – 16,410 – 1,750.61
✳️ जालना – 2,989.79 – 8,048 – 469.65
✳️ बीड – 48.80 – 160 – 17.21
✳️ लातूर – 2,40,676.37 – 3,91,231 – 32,732.97
✳️ उस्मानाबाद – 1,79,333.15 – 2,22,049 – 24,399.53
✳️ नांदेड – 5,27,491.00 – 7,41,946 – 71,788.92
✳️ परभणी – 3,724.25 – 6,043 – 506.49
✳️ हिंगाेली – 2,10,297.00 – 2,68,376 – 28,919.46
✳️ बुलडाणा – 46,562.60 – 12,184 – 858.67
✳️ अकाेला – 1,75,773.84 – 1,20,239 – 13,404.19
✳️ वाशिम – 1,48,057.28 – 1,62,709 – 19,723.85
✳️ अमरावती – 3,32,512.64 – 2,97,902 – 55,121.47
✳️ यवतमाळ – 5,17,090.69 – 5,13,005 – 68,808.98
✳️ वर्धा – 2,54,094.40 – 2,32,646 – 34,599.59
✳️ नागपूर – 2,53,571.06 – 2,67,092 – 33,968.52
✳️ भंडारा – 24,836.68 – 49,493 – 6,387.31
✳️ गाेंदिया – 13,624.81 – 28,751 – 3,059.26
✳️ चंद्रपूर – 2,21,898.02 – 2,30,362 – 30,203.39
✳️ गडचिराेली – 41,172.95 – 54,637 – 7,401.32
✳️ एकूण – 35,21,868.49 – 38,44,826 – 4,53,588.80

(पिकांचे नुकसान 1 जून ते 17 ऑक्टाेबर या काळातील आहे. यात नुकसानग्रस्त शेतकरी व नुकसान भरपाई देण्यासाठी लागणारा निधी हा जून ते ऑगस्ट दरम्यान नुकसानीचा आहे. 1 सप्टेंबर ते 22 ऑक्टाेबरमधील नुकसानग्रस्त शेतकरी व भरपाई निधी नाही.)

🌍 गाेगलगायच्या नुकसानीतून विदर्भ बाद
चालू खरीप हंगामात राज्यातील काही जिल्ह्यात गाेगलगायीचा प्रादुर्भाव झाला हाेता. यात मराठवाड्यातील बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांसाेबत विदर्भातील नागपूर व अमरावती जिल्ह्याचाही समावेश आहे. मात्र, नुकसानीने सर्वेक्षण करताना बीड जिल्ह्यातील 12,958 शेतकऱ्यांच्या 3,822.35 हेक्टर, लातूरमधील 1,08,636 शेतकऱ्यांच्या 68,385 हेक्टर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 401 शेतकऱ्यांच्या 283.33 हेक्टर शेतांमधील विविध पिकांचे नुकसान झाल्याचे दाखविण्यात आले. नुकसान भरपाईसाठी बीड जिल्ह्यासाठी 519.84 लाख रुपये, लातूरसाठी 9,300.36 लाख रुपये आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 38.60 लाख रुपयांची कृषी विभागाने राज्य सरकारकडे मागणी केली आहे. गाेगलगायीमुळे नागपूर जिल्ह्यातील काटाेल व नरखेड तसेच अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील संत्रा, माेसंबी बागांसह इतर पिकांचे नुकसान झाले असून, हे दाेन्ही जिल्हे नुकसान भरपाईतून वगळण्यात आले आहेत.

🌍 जून ते ऑगस्ट या काळातील नुकसान
1 जून ते 31 ऑगस्ट या काळात राज्यातील 34 जिल्ह्यांमधील 38,44,826 शेतकऱ्यांचे 31,71,338.49 हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाईसाठी 4,53,588.80 लाख रुपयांची राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. यात याच काळातील अतिवृष्टी व पुरामुळे 30,16,442 शेतकऱ्यांच्या 26,21,692.16 हेक्टरमधील तर सततच्या पावसामुळे 8,28,384 शेतकऱ्यांच्या 5,49,646.33 हेक्टरमधील पिकांच्या नुकसानीचा समावेश आहे. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी 3,78,019.37 लाख रुपयांची तर सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी 75,569.43 लाख रुपयांची मागणी केली आहे.

🌍 सप्टेंबर व ऑक्टाेबरमधील नुकसान
1 ते 30 सप्टेंबर या काळात काेसळलेल्या सततच्या पावसामुळे राज्यातील 12 जिल्ह्यांमधील 52 तालुक्यातील 2,37,434 हेक्टरमधील तर 1 ते 17 ऑक्टाेबर या काळात 16 जिल्ह्यांमधील 52 तालुक्यांमधील 1,13,091 हेक्टरमधील तसेच 18 ते 22 ऑक्टाेबर या काळात 22 जिल्ह्यांमधील विविध खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसान कापूस, साेयाबीन, मका या पिकांसह संत्रा, माेसंबी व केळी या फळपिकांचा समावेश आहे. त्याखालाेखाल धान (भात), बाजरी, तूर, नाचणी, हळद व भाजीपाल्याच्या विविध पिकांचा समावेश आहे. 18 ते 22 ऑक्टाेबर दरम्यान झालेल्या नुकसानीचे अद्याप सर्वेक्षण करण्यात आले नाही. शिवाय सप्टेंबरमधील नुकसानीची भरपाई देण्यासाठी नेमका किती निधी लागणार आहे, हेही राज्य महसूल विभाग व सरकारने स्पष्ट केले नाही.

🌍 नुकसान भरपाईसाठी हवे 4,634.46 काेटी रुपये
1 जून ते 17 ऑक्टाेबर या काळात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी एकूण 4,634.46 काेटी रुपयांची आवश्यक आहे. यात 1 जून ते 31 ऑगस्ट या काळातील अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी हव्या असलेल्या 3,780.19 काेटी रुपये, याच काळातील सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी 755.69 काेटी रुपये, गाेगलगायीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी 98.58 काेटी रुपयांचा समावेश आहे. सप्टेंबर व ऑक्टाेबरमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी किती निधीची आवश्यकता आहे, याचा अहवाल मात्र अद्याप तयार करण्यात आलेला नाही.

🌍 राज्याचे भौगोलिक क्षेत्र
राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 307.58 लाख हेक्टर आहे. त्यातील पेरणीयोग्य क्षेत्र 166.50 लाख हेक्टर आहे. प्रत्यक्षात खरीप हंगामातील पेरणी योग्य क्षेत्र 151.33 लाख हेक्टर आहे. राज्यातील एकूण 1.53 कोटी शेतकरी हंगामात पेरणी करतात. त्यापैकी 28.39 टक्के शेतकरी लहान आणि 51.13 टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत.

🌍 पर्जन्यमान – 1 जून ते 30 सप्टेंबर (मिमी)
जिल्हा – काेसळलेला पाऊस – सरासरी – कमी/अधिक (टक्के)
काेकण उपविभाग
✳️ मुंबई शहर – 1916.7 – 2094.5 – -8
✳️ मुंबई उपनगर – 2658.3 – 2318.8 – 15
✳️ उत्तर गाेवा – 2940.9 – 3085.5 – -5
✳️ पालघर – 3048.5 – 2262.7 – 35
✳️ रायगड – 3212.3 – 3127.4- 3
✳️ रत्नागिरी – 3334.7 – 3194.4 – 4
✳️ सिंधुदुर्ग – 3195.9 – 2950.7 – 8
✳️ दक्षिण गाेवा – 2607 – 2939.2 – -11
✳️ ठाणे – 3044 – 2433.3 – 25
✳️ एकूण – 3136.2 – 2870.8 – 9

मध्य महाराष्ट्र उपविभाग
✳️ अहमदनगर – 594.2 – 456 – 30
✳️ धुळे – 741.5 – 543.9 – 36
✳️ जळगाव – 693.7 – 625.2 – 11
✳️ काेल्हापूर – 1955.5 – 1711.4 – 14
✳️ नंदूरबार – 948 – 841.6 – 13
✳️ नाशिक – 1435.8 – 893.9 – 61
✳️ पुणे – 1265.3 – 949.2 – 33
✳️ सांगली – 396.6 – 486.1 – -18
✳️ सातारा – 1065 – 844.6 – 26
✳️ साेलापूर – 483.3 – 458.1 – 5
✳️ एकूण – 942.3 – 747.4 – 26

मराठवाडा उपविभाग
✳️ औरंगाबाद – 748.1 – 563.6 – 33
✳️ बीड – 667.5 – 557.4 – 20
✳️ हिंगाेली – 672.7 – 758.3 – -11
✳️ जालना – 671.3 – 591.8 – 13
✳️ लातूर – 840.8 – 666.8 – 26
✳️ नांदेड – 1145.9 – 782.6 – 46
✳️ उस्मानाबाद – 733.2 – 579.6 – 26
✳️ परभणी – 755.1 – 704.9 -7
✳️ एकूण – 794.2 – 642.8 – 24

विदर्भ उपविभाग
✳️ अकाेला – 660.3 – 694.2 – -5
✳️ अमरावती – 953.8 – 822.9 – 16
✳️ भंडारा – 1489.3 – 1085.1 – 37
✳️ बुलडाणा – 658 – 647.6- 2
✳️ चंद्रपूर – 1391 – 1076.3 – 29
✳️ गडचिराेली – 1799.3 – 1289.7 – 40
✳️ गाेंदिया – 1641.8 – 1214.7- 35
✳️ नागपूर – 1445.7 – 938.5 – 54
✳️ वर्धा – 1310 – 840.8 – 56
✳️ वाशिम – 808.3 – 772.3 – 5
✳️ यवतमाळ – 1087.3 – 808.8 – 34
✳️ एकूण – 1227.8 – 937.4 – 31

🌍 पर्जन्यमान – 1 ते 18 ऑक्टाेबर (मिमी)
जिल्हा – काेसळलेला पाऊस – सरासरी – कमी/अधिक (टक्के)
काेकण उपविभाग
✳️ मुंबई शहर – 161 – 61.6 – 161
✳️ मुंबई उपनगर – 216.9 – 71.9 – 202
✳️ उत्तर गाेवा – 90.2 – 115.3 – -22
✳️ पालघर – 86.6 – 51 – 70
✳️ रायगड – 190 – 93.4 – 103
✳️ रत्नागिरी – 142.4 – 109 – 31
✳️ सिंधुदुर्ग – 200.1 – 116.2 – 72
✳️ दक्षिण गाेवा – 44.6 – 113.8 – -61
✳️ ठाणे – 171.8 – 62.2 – 176
✳️ एकूण – 149.6 – 92 – 63

मध्य महाराष्ट्र उपविभाग
✳️ अहमदनगर – 144.6 – 56.4 – 156
✳️ धुळे – 78.4 – 28.3 – 177
✳️ जळगाव – 79.3 – 32.2 – 146
✳️ काेल्हापूर – 223.7 – 87.4 – 156
✳️ नंदुरबार – 63.3 – 27.7 – 129
✳️ नाशिक – 72 – 49 – 47
✳️ पुणे – 131.1 – 64.5 – 103
✳️ सांगली – 140 – 81.4 – 72
✳️ सातारा – 194.4 – 72.6 – 168
✳️ साेलापूर – 129.6 – 77 – 68
✳️ एकूण – 125.4 – 58.9 – 113

मराठवाडा उपविभाग
✳️ औरंगाबाद – 110.1 – 43 – 156
✳️ बीड – 129.3 – 57.3 – 126
✳️ हिंगाेली – 89.4 – 50.2 – 78
✳️ जालना – 86.4 – 47.5 – 82
✳️ लातूर – 124.3 – 69.4 – 79
✳️ नांदेड – 86 – 54.1 – 59
✳️ उस्मानाबाद – 147.9 – 68 – 117
✳️ परभणी – 105.2 – 60 – 75
✳️ एकूण – 110.5 – 55.7 – 98

विदर्भ उपविभाग
✳️ अकाेला – 87.4 – 43.3 – 102
✳️ अमरावती – 81.8 – 39.8 – 106
✳️ भंडारा – 106.5 – 39 – 173
✳️ बुलडाणा – 86.3 – 45.5 – 90
✳️ चंद्रपूर – 35.4 – 48.3 – -27
✳️ गडचिराेली – 61.1 – 50.8 – 20
✳️ गाेंदिया – 86.5 – 34.3 – 152
✳️ नागपूर – 98.9 – 36.5 – 171
✳️ वर्धा – 68.1 – 39.6 – 72
✳️ वाशीम – 120.5 – 52.7 – 129
✳️ यवतमाळ – 98.8 – 47.5 – 108
✳️ एकूण – 80.6 – 44.3 – 82

🌍 राज्यातील खरीप पेरणी क्षेत्र (हेक्टर)
✳️ धान (भात) – 14,72,379
✳️ ज्वारी – 1,45,519
✳️ बाजरी – 4,04,828
✳️ रागी – 66,576
✳️ मका – 8,76,111
✳️ इतर तृणधान्य – 30,03,808
✳️ तूर – 11,58,396
✳️ मूग – 2,77,528
✳️ उडीद – 3,56,840
✳️ इतर डाळवर्गीय पिके – 18,71,559
✳️ इतर अन्नधान्य पिके – 48,75,367
✳️ भुईमूग – 1,57,631
✳️ तीळ – 6,146
✳️ नायजर सीड – 5,024
✳️ सूर्यफूल – 15732
✳️ साेयाबीन – 48,51,499
✳️ इतर तेलबिया – 50,40,098
✳️ ऊस – 14,87,836
✳️ कापूस – 41,97,931

राज्यातील पेरणीक्षेत्र, पर्जन्यमान आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारीवर नजर टाकल्यास संपूर्ण राज्यभर ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार ही स्थिती नाकारत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर सत्ताधारी नेत्यांना शेतकऱ्यांच्या या दु:खाकडे लक्ष देण्यात वेळ मिळत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!