सोयाबीनवरील प्रमुख किडी व त्यांची ओळख
1 min read
खोडमाशी (Melanagromiza sojae)
ही माशी अगदी घरगुती माशीसारखी दिसत असून, जवळपास 2 मिमी. लांब आणि चटक काळया रंगाची असते. या किडीच्या अंडी, अळी, कोष आणि प्रौढ अशा चार अवस्था असतात संपुर्ण आयुष्यामध्ये 70 ते 80 अंडी घालते. अंड्यातून निघालेली अळी पाय नसलेली, 2-4 मि.मी. लांब असते. अळी सोयाबीनची पाने पोखरून नंतर पानांच्या देठातुन मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करते. खोडाचा आतील भाग ती पोखरून खाते व परिणामी पुनः पेरणी करण्यास भाग पडते किंवा उत्पादनात लक्षणीय घट येते. मोठ्या झाडांवर प्रादुर्भाव झाल्यास झाडावर खोडमाशीच्या अळीने प्रौढ माशीला बाहेर येण्यासाठी केलेले छिद्र आढळते. खोडमाशीच्या अळी आणि कोष अवस्था फांद्यात किंवा खोडातच पूर्ण होते. अशा प्रादुर्भावग्रस्त झाडांवरील फुलांची गळ होते. उत्पादनात 16 ते 30 टक्क्यांपर्यंत घट येते.

चक्रभुंगा-गर्डल बीटल (Obereopsis brevis)
सोयाबीन उत्पादन करणाऱ्या प्रमुख राज्यांमध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र व राजस्थानमध्ये गर्डल बीटल ही मुख्य नुकसानदायक कीड आहे. प्रौढ चक्रभुंगाचा रंग नारंगी असतो व त्याच्या पंखांचा खालचा भाग काळा असतो. त्याचे Antennac हे शरीराच्या बरोबर व पाठीमागे मुडलेली असतात. अळी ही फिकट पिवळ्या रंगाची व पुर्णवाद झालेली अळी जवळ-जवळ 2 सें.मी. लांब असते. सर्वप्रथम मादा फांदी/शाखेवर दोन चक्र (Gridle) बनवते. खालच्या चक्राजवळ एक छिद्र बनवते व झाडांच्या आतमध्ये एक फिकट/हलके पिवळ्या रंगाचा अंडा देते. दोन चक्राच्या मधोमधचा हिस्सा खोलल्यावर हा अंडा स्पष्ट दिसुन येतो. चक्र (Gridle) बनवल्या कारणाने चक्राच्या वरचा झाडांचा भाग सुखलेला/वाळलेला दिसतो. ही चक्रभुंगा असण्याची ओळख आहे. काही दिवसानंतर अंड्यातून अळी निघते व झाडांच्या/खोडांच्या आतील संपूर्ण भाग खाऊन टाकते. या कारणामुळे झाडांना शेंगा कमी लागतात व उत्पादनात बरीच घट येते. पूर्ण वाढ झालेली अळी झाडाला आतुन खाऊन टाकते व झाड कोसळुन पडते जुन-जुलैमध्ये दिलेल्या अंड्यातून निघालेली अळी खरीप हंगामामध्ये कोषावस्थेमध्ये जाते. काही दिवसानंतर प्रौढ़ बाहेर येतो व पुन्हा आपल्या जीवनचक्राला सुरुवात करतो. परंतु, सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात दिलेल्या अंड्यामधून निघालेली अळी ही सुप्त अवस्थेमध्ये जाते व पुढील वर्षी सुरुवात झाल्यावर जास्त जीवनक्रम करते. यावरून असे दिसून येते की जुलैमध्ये होणाऱ्या अळीचा प्रकोपमुळे सोयाबीनचे जास्त नुकसान होते. जेव्हा चक्रभुंगा एक टक्के पिकावर नुकसान करतो तेव्हा जवळ-जवळ 5.5 टक्के उत्पादन कमी होते.

तंबाखुचे पाने खाणारी अळी (Spodoptera litura)
ही कीड प्रामुख्याने तंबाखू या पिकावरील प्रमुख कीड होती. परंतु आता ही कीड सोयाबीन सोबत खुप साऱ्या पिकांवर नुकसान करताना आढळुन येत आहे. वाढीच्या दुसऱ्या अळ्यावर कीटकनाशकची प्रतिरोधकता पण पाहायला मिळते. प्रौढ पतंग 2-3 से.मी. व भुऱ्या रंगाचा असतो. त्याच्या वरच्या पंखावर पांढरे रंगाची वाकडी तिकडी रेषा असून, खालचे पंख पांढरे असतात. एक प्रौढ पतंग मादी तिच्या पूर्ण जीवनकाळात 1,200 ते 2,000 अंडी देतात. ती अंडी 200-250 च्या समुहाने पानाच्या खालच्या बाजूवर देतात. या अंडी समूहाला मादी तिच्या शरीराने झाकते. अंड्यांतून निघालेल्या1 लहान-लहान अळ्या हिरव्या रंगाची असतात. त्या 4 ते 5 दिवस पानांवर राहतात व हिरव्या पानांना खरचटून खातात. कालांतराने खाल्लेली सर्व पान व झाड जाळीदार होते. हे दुरवरून सुद्धा ओळखल्या जाऊ शकते. अळी मोठी झाल्यावर संपूर्ण शेतात विस्तारली जाते व पानांना खाऊन पिकाचे नुकसान करते. पूर्ण वाढ झालेली अळी ही हिरव्या भुऱ्या रंगाची असते व तिच्या अंगावर/शरीरावर मधोमध दोन्ही बाजुला काळ्या रंगाचे डाग दिसतात. ही अळीची विशेष ओळख आहे.
केसाळ अळी-बिहार हेअरी कॅटरपिलर (Spilarctia obilqua)
ही कीड महाराष्ट्रामध्ये, उत्तर पर्वतीय क्षेत्रामध्ये व मध्य प्रदेशामध्ये झांबुआ जिल्ह्यात सोयाबीन या पिकावर प्रामुख्याने आढळून येते. या किडीचे प्रौढ पतंग हलके पिवळ्या व फिकट गुलाबी रंगाची असतात. त्याच्यावर लहान-लहान काळे डाग असतात. लहान अळी फिकट पिवळ्या रंगाची असते. ही अळी मोठी झाल्यावर लाल-भुऱ्या रंगाची दिसते. अळ्यांच्या शरीरावर मोठे-मोठे दिसणारे केस असतात. या किडींचे जीवनचक्र व पिकाचे नुकसान करण्याचा तीव्रता तंबाखू वरील पाने खाणारी अळी सारखेच असते. शेवटी झाडांच्या जवळ जावूनच या किडींची ओळख होवू शकते.
उन्नी (Holotrichia consanguinea )
सोयाबीनचा प्रमुख शत्रु उन्नी आहे. रात्रीच्या वेळेस ही कीड (अळी) प्रकाशस्त्रोताजवळ तर दिवसा निकटवर्ती झाडाजवळ किंवा चुन्यावर दिसतात. प्रौढ निशाचर गडद कत्था किंवा काळ्या रंगाची असते. या किडीची अळी मळकट पांढऱ्या रंगाची अर्धवृत्ताकार असून, पूर्ण विकसित झाल्यावर 2 ते 3 स.मी. लांब असते. ही अळी (ग्रब) जमिनीच्या आत 3 ते 4 से.मी. खाली राहून झाडाच्या मुळ खातात. त्यामुळे झाड सुकून जाते व सुकलेले झाड सहजच ढासळून पडते. असे निदर्शनास आले आहे की ज्या शेतामध्ये कच्चे शेणखत/ओले शेणखत टाकलेले असते, त्या शेतात उन्नीचा प्रकोप जास्त असतो.

पांढरी माशी (Bemisia tabaci)
रस शोषण करणारी ही माशी जवळ-जवळ 2-3 मि.मी. आकाराची असते. ही पांढरी माशी दिल्ली, पंजाब, हरियाणा इत्यादी ठिकाणी सोयाबीन पिकांवर प्रमुख शत्रू आहे. ही दिसायला खुप छोटी असते व पानांच्या खालच्या बाजुला चिकटलेली दिसते. ही किड सोयाबीन पिकावर 13 प्रकारे नुकसान करते. प्रौढ किंवा शिशुद्वारे रस शोषण केल्यामुळे पाने पिवळे पडून कालांतराने गळुन पडतात. यामुळे झाडांची वाढ खुंटून फुलगळ आणि शेंगागळ सुद्धा होते. रस शोषण केल्यानंतर ही माशी चिकट पदार्थ सोडते. जो खालच्या पानांच्या वरच्या बाजुला जमा होतो व या चिकट पदार्थावर काळी बुरशी तयार होते. त्यामुळे पानांद्वारे प्रकाश संश्लेषण होत नाही. ही प्रौढ माशी पिवळा मोझाईक या विषाणुजन्य रोगाचे वाहन करते. ज्यामुळे फार कमी वेळेतच पूर्ण शेतात हा रोग पसरतो.
आई.पी.एम. व्यवस्थापन
उन्हाळयामध्ये खोलगट नांगरणी करावी.
पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी.
बी जास्तीत जास्त शिफारशीप्रमाणे वापरावे. नत्रयुक्त खताचा अतिरेक वापर टाळावा.