भारतात कापसाच्या वापरात वाढ; उत्पादनात घट, उद्योग संकटात!
1 min read🌎 बीटी कापूस व उत्पादनात वाढ
केंद्र सरकारने सलग पंचवार्षिक योजनांद्वारे सघन कापूस उत्पादन कार्यक्रमासारख्या विशेष योजना राबवायला सुरुवात केली. कापूस लागवड क्षेत्र वाढल्याने उत्पादनही वाढत गेले. कापसाच्या उत्पादन वाढीसाठी सन 1970 च्या दशकानंतर कापसाच्या संकरीत (हायब्रीड) वाणांना चालना देण्यात आली. तेव्हापासून सन 2002 पर्यंत देशात कापसाचे उत्पादन बऱ्यापैकी हाेत हाेते. केंद्र सरकारने सन 2002 मध्ये कापसाच्या बीटी-1 आणि बीटी-2 वाणांना परवानगी दिल्याने कापसाच्या उत्पादनात माेठी वाढ झाली व भारत कापूस उत्पादनात स्वयंपूर्ण झाला. परिणामी, देशांतर्गत सूत व कापड उद्योगाला चालना मिळाली. वाढत्या गरजांमुळे मध्यंतरी व त्यापूर्वी मोठ्या प्रमाणात कापूस आयात करावा लागायचा.
🌎 बीटी कापसाच्या ट्रायलवर बंदी
फेब्रुवारी 2000 पासून केंद्र सरकारने कापूस तंत्रज्ञान मिशन सुरू केले. या मिशन अंतर्गत उच्च प्रतिचे कापसाचे वाण विकसित करणे, तंत्रज्ञानाचे योग्य हस्तांतरण, उत्तम शेती व्यवस्थापन पद्धती, बीटी कापूस संकरित लागवडीखालील क्षेत्र वाढवणे आदीद्वारे कापसाचे उत्पादन वाढविण्यात काही अंशी यश मिळाले. मात्र, केंद्र सरकारने सन 2010 मध्ये बीटी कापसाच्या ट्रायलवर 10 वर्षासाठी बंदी घातली. तेव्हापासून आजवर देशात बीटी कापसाच्या चाचण्या घेण्यात आल्या नाही. शिवाय, बीटी तंत्रज्ञान अपग्रेड न केल्याने केंद्र सरकारने बियाणे तंत्रज्ञानावर बंदी घालून माेठा घाेळ निर्माण केला. परिणामी, सन 2014 पासून देशांतर्गत कापूस उत्पादनात माेठी उलथापालथ हाेत गेली.
🌎 अन्यथा भारताला कापूस आयात करावा लागेल
बीटी तंत्रज्ञान अपग्रेड न केल्याने किंबहुना सन 2014 पासून त्यावर केंद्र सरकारने बंदी घातल्याने एकीकडे भारतीतील कापसाचे उत्पादन घटायला सुरुवात झाली. भारतीय शेतकरी वापरत असलेले कापसाचे बीटी हायब्रीड वाण गुलाबी बाेंडअळीला प्रतिबंधक राहिले नाही. तंत्रज्ञान अपग्रेड न केल्याने भारतीय शेतकऱ्यांना कालबाह्य झालेले बीटी बियाणे वापरावे लागत आहे. गुलाबी बाेंडअळी आणि रस शाेषण करणाऱ्या किडींच्या तावडीतून कपाशीचे पीक वाचविणे कठीण झाले. या किडींमुळे कापसाच्या उत्पादनात दरवर्षी सरासरी 30 ते 40 टक्के घट होत आहे. त्यातच भारतातील कापसाची सरासरी उत्पादकता प्रति हेक्टरी 300 किलाेवर स्थिर झाली. सन 2017-18 मध्ये कापसाची सरासरी उत्पादकता ही प्रति हेक्टरी 506 किलो हाेती. सन 2013-14 मध्ये कापसाची प्रति हेक्टरी उत्पादकता 566 किलोपर्यंत पाेहाेचली हाेती. विशेष म्हणजे, जागतिक पातळीवर कापसाची सरासरी उत्पादकता प्रति हेक्टरी 762 किलो व त्यापेक्षा अधिक आहे. भारतात कापसाची सरासरी उत्पादकता कमी असली तरी लागवड क्षेत्र अधिक असल्याने कापसाचे उत्पादन वाढले आहे. केंद्र सरकारने बियाणे तंत्रज्ञानावरील (GM Seed) बंदी हटविल्यास तसेच कापूस उत्पादन वाढीस सर्वंकष प्रयत्न केल्यास जगात भारत क्रमांक एकचा दर्जेदार कापूस उत्पादक देश ठरू शकताे. कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न केल्यास भारत हा जगात सर्वात माेठा कापूस निर्यातदार देश ठरू शकताे. त्यासाठी केंद्र सरकारने त्यांच्या शेतीविषयक धाेरणात मूलभूत बदल करणे अत्यावश्यक आहे. केंद्र सरकारने कृषी विषयक धाेरणात आमूलाग्र बदल न केल्यास भारताला भविष्यात माेठ्या प्रमाणात कापसाची आयात करावी लागणार आहे.
🌎 भारतातील कापसाचे उत्पादन व उत्पादकता
✳️ वर्ष – क्षेत्र (लाख हेक्टर) – उत्पादन ( लाख गाठी) – उत्पादन (प्रति हेक्टर-किलो)
✴️ सन 2019-20 – 134.77 – 365.00 – 460
✴️ सन 2020-21(P) – 132.85 – 352.48 – 451
✴️ सन 2021-22 (P) – 123.50 – 340.62 – 469
🌐 स्रोत :- 22 मार्च 2022 रोजी झालेली Committee on Cotton Production and Consumption-COCPC ची बैठक. (P- तात्पुरती)
🌎 कापसाचा ताळेबंद
भारतातील कापूस उत्पादन आणि देशांतर्गत वस्त्रोद्योगाच्या विविध विभागांद्वारे त्याचा वापर यावर आधारित COCPC ने काढलेला सन 2019-20, 2020-21 आणि 2021-22 च्या हंगामातील कापूस ताळेबंद. (प्रति गाठ 170 किलो)
🌎 भारतातील कापसाचा ओपनिंग स्टाॅक (लाख गाठी)
✴️ सन 2019-20 – 56.52
✴️ सन 2020-21 (P) – 120.79
✴️ सन 2021-22 (P) – 71.84
🌎 भारतातील कापसाचे एकूण उत्पादन (लाख गाठी)
✴️ सन 2019-20 – 365.00
✴️ सन 2020-21 (P) – 352.48
✴️ सन 2021-22 (P) – 340.62
🌎 भारतातील कापसाची आयात (लाख गाठी)
✴️ सन 2019-20 – 15.50
✴️ सन 2020-21 (P) – 11.03
✴️ सन 2021-22 (P) – 18.00
🌎 भारतातील कापसाचा पुरवठा (लाख गाठी)
✴️ सन 2019-20 – 437.02
✴️ सन 2020-21 (P) – 484.30
✴️ सन 2021-22 (P) – 430.46
🌎 भारतातील सूत व कापड गिरण्यांची कापूस मागणी (लाख गाठी)
✴️ सन 2019-20 – 233.70
✴️ सन 2020-21 (P) – 297.45
✴️ सन 2021-22 (P) – 305.00
🌎 भारतातील छोट्या मिलमधील कापसाचा वापर (लाख गाठी)
✴️ सन 2019-20 – 20.49
✴️ सन 2020-21 (P) – 22.42
✴️ सन 2021-22 (P) – 24.00
🌎 भारतातील गिरणी व्यतिरिक्त कापसाचा वापर (लाख गाठी)
✴️ सन 2019-20 – 15.00
✴️ सन 2020-21 (P) – 15.00
✴️ सन 2021-22 (P) – 16.00
🌎 भारतातील कापसाचा एकूण वापर (लाख गाठी)
✴️ सन 2019-20 – 269.19
✴️ सन 2020-21 (P) – 334.87
✴️ सन 2021-22 (P) – 345.00
🌎 भारतातील कापसाची निर्यात (लाख गाठी)
✴️ सन 2019-20 – 47.04
✴️ सन 2020-21 (P) – 77.59
✴️ सन 2021-22 (P) – 40.00
🌎 भारतातील कापसाची एकूण मागणी (लाख गाठी)
✴️ सन 2019-20 – 16.23
✴️ सन 2020-21 (P) – 412.46
✴️ सन 2021-22 (P) – 385.00
🌎 भारतातील कापसाचा क्लाेसिंग स्टाॅक (लाख गाठी)
✴️ सन 2019-20 – 120.79
✴️ सन 2020-21 (P) – 71.84
✴️ सन 2021-22 (P) – 45.46
🌐 स्राेत :- 22 मार्च 2022 रोजी झालेली Committee on Cotton Production and Consumption-COCPC ची बैठक. (P- तात्पुरती)
🌎 जगात भारताचा वाटा
✳️ जगात दरवर्षी सरासरी 333 ते 335 लाख हेक्टर क्षेत्र कपाशीच्या लागवडीखाली असते. यातील 37 टक्के म्हणजेच 120.69 ते 130.5 लाख हेक्टर कापूस लागवड क्षेत्र एकट्या भारतात आहे.
✳️ हे क्षेत्र जगातील इतर कापूस उत्पादक देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. त्यामुळे जगात भारताला कापूस लागवड क्षेत्रात पहिले स्थान मिळाले आहे.
✳️ भारतातील सुमारे 67 टक्के कापसाचे उत्पादन पावसाच्या पाण्यावर तर 33 टक्के कापसाचे उत्पादन बागायती क्षेत्रावर घेतले जाते.
✳️ कापूस उत्पादकतेच्या बाबतीत भारत (प्रति हेक्टरी 510 किलो) जगात 38 व्या क्रमांकावर आहे.
🌎 कापसाचे लागवड क्षेत्र (लाख हेक्टर)
✳️ वर्ष – जग – भारत
✴️ सन 2020-21 (P) – 330.48 – 120.35
🌐 स्रोत :- The International Cotton Advisory Committee-ICAC जर्नल 19 मे 2022 तथा 22 मार्च 2022 रोजी झालेली Committee on Cotton Production and Consumption-COCPC ची बैठक. (P- तात्पुरती)
✳️ भारत हा जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे. भारत जागतिक एकूण कापूस उत्पादनापैकी 22 टक्के कापसाचे उत्पादन करतो.
✳️ भारतात कापसाची हेक्टरी उत्पादकता सरासरी 469 किलो आहे. जागतील इतर देशांमध्ये कापसाची प्रति हेक्टरी उत्पादकता सरासरी 787 किलो एवढी आहे.
✳️ जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील कापसाची प्रति हेक्टर/किलाे उत्पादकता बरीच कमी आहे. सरकारने प्रामाणिक प्रयत्न केल्यास ही उत्पादकता किमान दीड पटीने वाढू शकते.
🌎 कापसाचे एकूण उत्पादन (मेट्रिक टन)
✳️ वर्ष – जग – भारत
✴️ सन 2020-21 (P) – 260.360 – 50.790
✴️ सन 2019-20(P) – 260.160 – 50.700
🌐 स्रोत :- The International Cotton Advisory Committee-ICAC जर्नल 19 मे 2022 तथा 22 मार्च 2022 रोजी झालेली Committee on Cotton Production and Consumption-COCPC ची बैठक. (P- तात्पुरती)
🌎 भारतातील कापसाचा वापर
वस्राेद्याेग हा भारतातील सर्वात माेठा उद्याेग आहे. गेल्या दाेन दशकात भारतात स्थापित स्पिंडलेज आणि सूत उत्पादनात अभूतपूर्व वाढ झाली आहे. शिवाय, याच काळात ओपन-ॲण्ड रोटर्सची स्थापना व निर्यात केंद्रीत युनिट्सची निर्मितीही झाली आहे. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने भारतीय स्पिनिंग उद्योग आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाच्या ट्रेंडशी जुळवून घेण्यास सक्षम आहे. दुसरीकडे, जागतिक एकूण कापूस वापराच्या तुलतेत भारतात किमान 22 टक्के कापूस वापरला जात असल्याने भारत हा कापसाचा सर्वात मोठा ग्राहकही बनला आहे.
अभ्यासपूर्ण मांडणी..
Very nice information
Nice information ,Sir