‘निफाड’मध्येच थंडीची हुडहुडी जास्त का?
1 min read1. निफाड हा समुद्र सपाटीपासून 569 मीटर उंचीवरील सखल भूभाग असून, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे उंच डोंगर किंवा पर्वत नाहीत.
2. निफाडमधील समतल भागावर हवेची घनता ही जास्त आढळून येते. याठिकाणी हवेचा थर साठून राहतो.
3. जास्त घनतेची हवा ही जास्त दाबाचा भाग बनविते.
4. जास्त दाबाचा भाग म्हणजेच कमी तापमान असे सूत्र आहे. परिणामी, निफाडचे तापमान नाशिक जिल्ह्यात नेहमीच कमी आढळते.
5. या व्यतिरिक्त निफाडमध्ये हिरवीगार झाडे आणि बागायती शेतीची पिके (द्राक्ष, ऊस, कांदा, गहू, डाळिंब) यांची रेलचेल आहे. जी निफाडमध्ये जास्त दाबाचा हवेचा थर टिकून ठेवते. थंड हवेमुळे आणि काळ्या कसदार जमिनीमुळे निफाडमध्ये दीपावलीनंतर लागवड होणारा रबी हंगामातील गहू देखील चांगल्या प्रकारे पिकतो.
6. निफाडमध्ये वाऱ्यांची गती देखील कमी आढळते. जी तापमान कमी ठेवण्यास पूरक आणि महत्वाचा भाग ठरते.
7. निफाडला गोदावरी नदीचे विस्तीर्ण पात्र लाभले आहे. त्यामुळे मोठा जलसाठा जमिनीत होतो. निफाडमध्ये पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे. जी जमिनीचे तापमान कमी ठेवण्यास उपयोगी ठरतो आणि परिणामी हवेचे तापमान देखील घटते.
8. निफाडमध्ये आकाश निरभ्र असते. त्यामुळे दिवस जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता लवकर हवेत फेकली जाते आणि जमिनीलगतचा तापमान वेगाने घटते आणि थंडी वाढते.