krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Rain Possibility : 12 दिवस पावसाची शक्यता नाही!

1 min read

Rain Possibility : सध्या रब्बी पीक काढणीचा काळ आहे. त्यातच पावसासंबंधी (Rain) भडक बातम्या पसरवून शेतकऱ्यांना घाबरविले जात आहे. वातावरणीय सध्याची स्थिती विचारात घेता प्रत्यक्षात पुढील 10 ते 12 दिवस म्हणजे शुक्रवार (दि. 24 एप्रिल)पर्यंत पावसाची शक्यता (Possibility) नसल्याने शेतकऱ्यांनी घाबरून जाण्यासारखी अशी स्थिती नाही. नंतरच्या कालावधीचा वातावरणीय स्थिती (Weather Conditions) विचारात घेऊन खुलासा केला जाईल.

📍 ढगाळ वातावरण व किरकोळ पाऊस
ठाणे, पालघर, रायगड, पुणे, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, बीड, जालना, परभणी, नांदेड, अकोला, नागपूर व चंद्रपूर या 14 जिल्ह्यांत सोमवार (दि. 20 एप्रिल) ते बुधवार (दि. 22 एप्रिल) या तीन दिवसा दरम्यान ढगाळ वातावरण राहून अगदीच किरकोळ म्हणजे 2 ते 3 मिमी इतक्या पावसाची शक्यता जाणवते.

📍 उन्हाची ताप व उष्णतेच्या लाटा
अजूनही पुढील 5 दिवस म्हणजे शुक्रवार (दि. 17 एप्रिल) म्हणजेच चैत्री आमावस्यापर्यंत महाराष्ट्रातील दुपारचे कमाल तापमान सरासरीच्या व काही ठिकाणी एखाद्या डिग्रीने वाढीव पातळीत असण्याची शक्यता आहे. शनिवार (दि. 18 एप्रिल) वैशाख मासारंभापासून एप्रिल अखेरपर्यंत मात्र महाराष्ट्रातील दुपारच्या कमाल तापमानात वाढ होवून, मुंबईसह संपूर्ण कोकणातील 7 जिल्हे व मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्रीला लागून असलेल्या पश्चिम भाग व घाटमाथ्यावरील क्षेत्रात सरासरीपेक्षा तापमानात अधिक वाढ जाणवेल. शिवाय, मराठवाडा व विदर्भात काही जिल्ह्यांच्या ठिकाणी उष्णतेच्या लाटेचीही शक्यता जाणवते.

📍 मान्सून 2026 चा
जून ते सप्टेंबर 4 महिन्यात महाराष्ट्रात पाऊस हा सरासरीपेक्षा कमीच राहणार आहे. अल निनो (El Nino) हा ऑगस्ट व सप्टेंबर ह्या 2 महिन्यात अवतरण्याची शक्यता आहे. परंतु ह्याच 2 महिन्यात आयओडी (IOD – indian ocean dipole) हा धन असण्याच्या शक्यतेमुळे मान्सूनवर अधिकच अतिविपरित परिणाम जाणवणार नसल्याची शक्यता आहे. ह्या संबंधी सविस्तर अहवाल येत्या 2 दिवसात प्रस्तुत केला जाईल.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!