krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cotton prices : कापूस दरातील पडझड कायम; शेतकरी संघटनेचे राज्यव्यापी आंदाेलन

1 min read
Cotton prices : एमसीएक्स कमाेडिटी एक्सचेंजवर कापसाचे जानेवारी 2023 व त्यापुढील वायदे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे तीन आठवड्यांपासून कापसाच्या दरात (Cotton prices) माेठी पडझड हाेत आहे. वायदा बंदी व बाजारात आडकाठी निर्माण करून कापसाचे दर पाडले जात असल्याने ही पडझड कृत्रिम आहे, असा आराेप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे यांनी अकाेला शहरात आयाेजित पत्रपरिषदेत बुधवारी (28 डिसेंबर) केला. ही पडझड थांबविण्यासाठी शेतकरी संघटना राज्यव्यापी आंदाेलन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात 9 जानेवारी 2023 राेजी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमाेर निदर्शने केली जाणार असून, दुसऱ्या टप्प्यात 23 जानेवारी 2023 राेजी मुंबईतील सेबीच्या (भारतीय सुरक्षा आणि नियमन मंडळ) कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

🟢 दर पाडण्यासाठी सेबीचा वापर
वायदे बाजारात डिसेंबर महिन्यापर्यंतचे सौदे रोलओव्हर होणे थांबले आहे. आगामी जानेवारीपासून नवीन सौदे लाँच होणे अपेक्षित होते; परंतु ‘सेबी’कडून या प्रक्रियेसाठी परवानगी प्रलंबित आहे. व्यापारी व शेतकऱ्यांना कापसाच्या नवीन दरासंदर्भात अंदाज येत नसल्याने कापसाच्या प्रति क्विंटल दरात 500 ते 700 रुपये घसरण झाली आहे. दरातील ही घसरण ‘सेबी’च्या अकार्यक्षमतेमुळेच झाल्याचा आरोप ललित बहाळे यांनी केला. केंद्र शासनाने कापसाचा वायदे बाजार सुरळीत होण्यासाठी त्वरित याेग्य पावले उचलावीत. असे न केल्यास दबावाला बळी पडून कापसाचे भाव खालच्या पातळीवर ठेवण्यासाठी ‘सेबी’चा उपयोग केला जात आहे, हे सिद्ध हाेईल, अशी टीकाही त्यांनी केली.

🟢 सुताची आयात
चीन व ऑस्ट्रेलियातील सूत व्हिएतनाममार्गे किंवा सरळ आयात करण्यात आली. जागतिक व भारतीय बाजारपेठेत ज्यावेळी सुताचे भाव 19 रुपये प्रति किलाे होते, त्यावेळी हे सूत भारतात 10 रुपय प्रति किलाे दराने आयात करण्यात आले. सुताचे हे डम्पिंग त्वरित थांबवावे, तसेच कापूस निर्यातीसाठी प्रोत्साहनपर संयुक्तिक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही शेतकरी संघटनेने केली आहे.

🟢 सीसीआयची कापूस खरेदी बंद करा
सीसीआयने महाराष्ट्रासह ओडिशात काही ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहेत. त्यांचे काही खरेदी केंद्र प्रस्तावित आहेत. सीसीआय चढ्या दराने म्हणजे बाजारातील सर्वोच्च दराने कापूस खरेदी न करता कमीत कमी पातळीच्या दरात कापसाची खरेदी करीत आहे. त्यामुळे सीसीआय बाजारात कापसाचे दर पाडण्याचे अप्रत्यक्ष काम करीत असल्याने त्यांची कापूस खरेदी पूर्णपणे बंद करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

🟢 कापूस उत्पादनात घट
यंदा विदर्भ, मराठवाड्यात काेसळलेल्या अति मुसळधार पावसामुळे कपाशीचे प्रचंड नुकसान झाले. कापसाचे त्यातच उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. सरकारी हस्तक्षेपांमुळे शेतमालाच्या नुकसानीच्या तुलनेत भरपाई शक्यता धुसर झाली आहे. त्यातच कापसाचे दर पाडण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आराेप ललित बहाळे यांनी केला असून, त्याविराेधात राज्यव्यापी आंदाेलन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रपरिषदेला सतीश देशमुख, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौटकर, विलास ताथोड, युवा आघाडीचे विदर्भ अध्यक्ष डॉ. नीलेश पाटील, नीलेश नेमाडे, अमोल खिरोळकर, दिनेश देऊळकर उपस्थित होते.

1 thought on “Cotton prices : कापूस दरातील पडझड कायम; शेतकरी संघटनेचे राज्यव्यापी आंदाेलन

  1. Greetings from Carolina! I’m bored at work so I decided to browse your
    website on my iphone during lunch break. I enjoy the info you present here and can’t wait to take a look when I get home.
    I’m shocked at how fast your blog loaded on my cell phone ..
    I’m not even using WIFI, just 3G .. Anyhow, wonderful
    site!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!