Social menu is not set. You need to create menu and assign it to Social Menu on Menu Settings.

June 11, 2026

krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Digital Pattern Role Model : नागपूर जि. प. चा ‘डिजिटल पॅटर्न’ ठरणार ‘रोलमॉडेल’

1 min read

Digital Pattern Role Model : सरकारी कारभार म्हटला की डोळ्यासमोर येणाऱ्या फाईल्सचे ढिगारे आणि लालफितीचा कारभार आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. नागपूर जिल्हा परिषदेने ‘ई-गव्हर्नन्स’ (E-Governance) आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (Artificial Intelligence) या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या ‘डिजिटल पॅटर्न’ (Digital Pattern)ची चर्चा राज्यभर सुरू झाली आहे. 150 दिवसांच्या ‘ई-गव्हर्नन्स’ सुधारणा कार्यक्रमात नागपूरने राज्यात मिळवलेला प्रथम क्रमांक राज्यातील इतर 33 जिल्हा परिषदांसाठी तो एक आधुनिक प्रशासकीय वस्तुपाठ ठरला आहे.

📍 ‘ज्ञानरथ’ आणि प्रायोगिक शिक्षण
विसाव्या शतकातील प्रत्यक्ष भेटींवर आधारित प्रशासकीय चौकटीला छेद देत नागपूरने तंत्रज्ञानाचे खऱ्या अर्थाने विकेंद्रीकरण केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेला ‘एआय लॅब ऑन व्हील्स’ (ज्ञानरथ) हा उपक्रम राज्यासाठी पथदर्शक ठरत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोडिंग, रोबोटिक्स आणि थ्रीडी डिझाइनिंगचे धडे थेट त्यांच्या दारापर्यंत नेण्याचे काम या उपक्रमाने केले आहे. केवळ शहरांपुरते मर्यादित राहणारे हाय-टेक शिक्षण आता खेड्यापाड्यांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये पोहोचल्याने ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न स्थानिक पातळीवर प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.

📍 प्रशासकीय पारदर्शकता आणि ‘डेटा-ड्रिव्हन’ निर्णयक्षमता
नागपूर पॅटर्नचे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षणासोबतच प्रशासकीय कामात आणलेली ‘रिअल-टाइम’ पारदर्शकता. ‘एआय अंगणवाडी’ हा देशातील पहिलाच प्रयोग असून, याद्वारे मुलांच्या उपस्थितीपासून त्यांच्या पोषण मूल्यांपर्यंतचा डेटा एआयच्या मदतीने विश्लेषित केला जातो. यामुळे मानवी हस्तक्षेपातील त्रुटी कमी झाल्या असूऩ संसाधनांचे वाटप अधिक अचूक झाले आहे. मंत्रालयाच्या धर्तीवर राबविलेली एकात्मिक ई-टपाल सेवा आणि कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी विकसित केलेले डिजिटल डॅशबोर्ड यामुळे फाईल्सचा प्रवास आता सुसाट आणि पारदर्शक झाला आहे.

📍 ‘नॅालेज हब’ची निर्मिती
सरकारी मालमत्तेचा सुयोग्य वापर कसा करावा, याचे उत्तम उदाहरण नागपूरने सादर केले आहे. जिल्ह्यातील 103 गावांमध्ये देखभालीअभावी पडून असलेल्या जुन्या ग्रामपंचायती आणि समाजभवनांचे रूपांतर आधुनिक डिजिटल वाचनालयांमध्ये करण्यात आले आहे. नगरधन, फेटरी आणि काचुरवाही यासारख्या गावांत ही केंद्रे आता केवळ ग्रंथालये नसून, ती स्पर्धा परीक्षांचे ‘नॉलेज हब’ म्हणून नावारूपास येत आहेत. वर्षानुवर्षे कुलूपबंद असलेल्या खोल्या आता विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारी ‘ज्ञानाची मंदिरे’ बनली आहेत.

📍 डिजिटल झेप : कुठे काय घडतेय?
नागपूरच्या या यशस्वी प्रयोगानंतर राज्यातील इतर काही जिल्हा परिषदांनीही तांत्रिक सुधारणांच्या दिशेने पावले उचलली आहेत. नागपूरच्या धर्तीवर सोलापूरमध्येही अंगणवाड्यांचे डिजिटलायझेशन आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम्स आणि डिजिटल लर्निंग रिसोर्सेसवर विशेष भर दिला जात आहे. सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत प्रशासकीय कामकाजात क्यूआर कोड आधारित फाईल ट्रॅकिंग सिस्टीमचा वापर करून पारदर्शकता आणली जात आहे. विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी ‘रिअल-टाइम’ मॉनिटरिंग सिस्टीमचा प्रभावी वापर पुणे जिल्हा परिषद करत आहे. जिल्हा परिषद प्रशासकीय कामकाजात क्यूआर कोड आधारित फाईल ट्रॅकिंग सिस्टीमचा वापर करून पारदर्शकता आणली जात आहे. विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी ‘रिअल-टाइम’ मॉनिटरिंग सिस्टीमचा प्रभावी वापर पुणे जिल्हा परिषद करत आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!