krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

कपाशीवरील कीड, राेग च सूत्रकृमींचे व्यवस्थापन

1 min read
कपाशीच्या पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव हाेत असल्याने पिकांचे नुकसान हाेऊन उत्पादनात घट येते. शिवाय, उत्पादन खर्चही वाढताे. या कीड व राेगांचे वेळीच याेग्य व्यवस्थापन केल्यास पिकांच्या नुकसानीची तीव्रता आणि आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते.

गुलाबी बोंडअळी
✳️ इमिडाक्लोप्रीड 70 डब्ल्यूएस 10 ग्राम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी.
✳️ रस शोषक किडींसाठी आर्थिक नुकसानीच्या पातळीवर आधारीत शिफारशीत आंतरप्रवाही किटकनाशकाची गरजेनुसार एक फवारणी करावी.
✳️ ट्रायकोग्रामा चिलोनीस या परोपजीवी किटकाची अंडी पेरणीनंतर 45 ते 50 आणि 55 ते 60 दिवसांनी अशी दोन वेळा कपाशीचे शेतात सोडावीत.
✳️ एचएएनपीव्ही या विषाणूची हेक्टरी 500 एलई या प्रमाणात एक फवारणी करावी.
✳️ पाच टक्के निंबोळी अर्काची एक फवारणी करावी.
✳️ गरजेनुसार बोंडअळ्यांसाठी शिफारशीत रासायनिक किटकनाशकांच्या आर्थिक नुकसानीच्या पातळीवर आधारीत एक किंवा दोन फवारण्या कराव्यात.
✳️ कोरडवाहू कपाशीवरील किडींचे परिणामकारक, प्रभावी आणि किफायतशीर एकीकृत कीड व्यवस्थापनासाठी थायोमेथोक्झाम 70 डब्ल्यूएस 4.28 ग्राम प्रति किलो बियाण्याला पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी.
✳️ रस शोषक किडींकरिता अॅसिटामिप्रीड 20 एसपी 15 ग्राम क्रियाशील घटक प्रति हेक्टर या प्रमाणात एक फवारणी करावी.
✳️ उगवणीनंतर 45 ते 50 आणि 55 ते 60 दिवसांनी अशी दोन वेळा ट्रायकोग्रामा चिलोनीसची अंडी हेक्टरी दीड लाख या प्रमाणात कपाशीचे सोडावे.
✳️ Histori साठी निमार्क 300 पीपीएम 5 मि.ली. प्रति लिटर, स्पीनोसॅड 45 एससी 50 ग्राम क्रियाशील घटक प्रति हेक्टर आणि बिटा-सायफ्ल्यूथ्रीन 2.5 टक्के प्रवाही 0.0025 टक्के तीव्रतेची आवश्यकतेनुसार सलग एक एक फवारणी.
✳️ अमेरिकन आणि ठिपक्याच्या बोंडअळीचे व्यवस्थापनासाठी स्पीनोसॅड 45 एससी 0.01 टक्के आणि गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापनासाठी बिटा-सायफ्ल्यूथ्रीन 2.5 टक्के प्रवाही 0.0025 टक्के तीव्रतेच्या फवारणी करावी.
✳️ कापूस पिकाचा हंगाम मध्य भारतात डिसेंबर – जानेवारी दरम्यानच संपुष्टात आणावा.
✳️ पूर्वहंगामी (एप्रिल-मे) कपाशीची लागवड टाळावी.
✳️ अर्धवट उमललेली प्रादुर्भावग्रत बोंडे व पिकाचे अवशेष त्वरित नष्ट करावेत.
✳️ बीटी बियाण्यासोबत गैर बीटीचे बियाणे दिले असल्यास त्याची आश्रय पीक म्हणून लागवड करावी.
✳️ गुलाबी बोंडअळीने प्रादुर्भावग्रस्त कापसाची गोदामामध्ये साठवण करू नये.
✳️ संकरीत बीटी अथवा सरळ वाणांचे बियाणे नेहमी अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावे व दुकानदाराकडून पक्के बिल घ्यावे व ते हंगाम संपेपर्यंत जपून ठेवावे.
✳️ शिफारस केलेल्या कमी कालावधीत पक्व होणाऱ्या बीटी कापूस अथवा सरळ वाणांची वेळेतच म्हणजे जून महिन्यात पेरणी करावी.
✳️ गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम खंडीत करण्यासाठी पिकांची फेरपालट करावी.
✳️ पतंगांच्या हालचालीवर लक्ष्य ठेवण्यासाठी पेरणीच्या 45 दिवसानंतर हेक्टरी 5 याप्रमाणे कामगंध सापळे लावावेत.
✳️ गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे निदान करण्यासाठी पात्या व फुले लागण्याच्या अवस्थेत वेळोवेळी निरीक्षण करावे.
✳️ बोंडे लागण्याच्या अवस्थेत एक एकर क्षेत्रातून वेगवेगळ्या झाडांची 20 बोंडे तोडून ती फोडून पहावी.
खाली गळून पडलेली प्रादुर्भावग्रस्त पात्या, फुले व बोंडे गोळा करून त्वरित नष्ट करावी.
✳️ पेरणीपासून 50-60 दिवसानंतर निंबोळी तेल 5 मिली, 5 टक्के निंबोळी बियांचा अर्क, धुण्याचा सोडा 1 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
✳️ ट्रायकोग्रामा बॅक्ट्रिया अंड्यावर उपजीविका करणारा परोपजीवी मित्र कीटक 60,000 प्रति एकर याप्रमाणे एका आठवड्याच्या अंतराने कपाशीच्या फुलोरा अवस्थेत तीनदा प्रसारण केल्यास चांगले नियंत्रण मिळते.
✳️ मान्यता असलेल्या व शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करावी. जहाल विषारी किंवा उच्च विषारी गटातील कीटकनाशकांची फवारणी टाळावी.

मुळकुज
रोप अवस्था ते बाह्यवृद्धी अवस्थेपर्यंत झिंक सल्फेट 24 किला प्रति एकरी मातीमध्ये मिसळवावे. ट्रायक्रोडर्मा 4 ग्राम किंवा सुडोमोनस फ्लुरोसन्स 10 ग्राम व थायरम 75 टक्के डब्लूएस 3 ग्राम प्रती किलाे बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. ट्रायक्रोडर्मा 10 किलाे प्रति हेक्टर 200 किलो शेणखतात मिसळून द्यावे. कार्बेन्डॅझिम 50 टक्के डब्लूपी प्रती 2 लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या मुळाजवळ आणि लगतच्या निरोगी झाडाजवळ टाकावे.

मर
थायरम 75 टक्के डब्ल्यूएएस 3 ग्राम प्रति किलाे बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी अथवा कार्बेन्डॅझिम 50 डब्ल्यूपी 2 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या मुळाजवळ टाकावे

बोंड सडन
बोंड धारण अवस्थेत बाेंडाच्या बाहेरच्या भागावर बोंड सडनचे लक्षण दिसल्यास कार्बेन्डॅझिम 50 डब्ल्यूपी 2 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून आणि आंतरिक सडन असल्यास कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्राम व 2.5 ग्राम स्ट्रेप्टोसायक्लिन प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पानावरील डाग व चट्टे
फुले व बाेंड येण्याची अवस्थेत पायरक्लोस्ट्रोबीन 20 टक्के डब्लूजी 2 ग्राम अथवा मेटीरम 55 टक्के व पायरक्लोस्ट्रोबीन 5 टक्के डब्लूजी 20 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळवून फवारणी करावी.

अनुजीवी करपा
कोणत्याही अवस्थेत कार्बोक्झीन 75 टक्के डब्लूपी 1.5 ग्राम प्रति किलाे अथवा कार्बोक्झीन 37.5 टक्के व थायरम 37.5 टक्के डीएस 2.5 ग्राम प्रति किलाे बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. स्ट्रेप्टोसायक्लीन 1 ग्राम व कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्लूपी 25 ग्रात प्रति 10 लिटर पाण्यात मिसळवून फवारणी करावी.

दहिया
बोंड येण्याची अवस्थेत कार्बेन्डॅझिम 50 डब्लूपी 20 ग्राम किंवा पायराक्लोस्ट्रोबीन 20 टक्के डब्लूजी 2 ग्राम अथवा अथवा मेटीरम 55 टक्के व पायराक्लोस्ट्रोबीन 5 टक्के डब्लूजी 20 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळवून फवारणी करावी.

तंबाखू स्ट्रीक विषाणू
पात्या, फुले व बाेंड धरण्याच्या अवस्थेत फुलकिड्यांच्या व्यवस्थापनसाठी थायोमेथोक्साम 25 टक्के डब्ल्यूजी 2 ग्राम प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन
✳️ रोग टाळण्यासाठी पेरणीपूर्व तथा पेरणीच्या काळात (मे-जून) करावयाची कामे उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी. शेत कडक उन्हात तापू द्यावे. त्यामुळे माती द्वारे पसरणारे रोगकारक जीवाणू व बुरशी कडक उन्हात नष्ट होतील.
✳️ खोडवा पीक घेणे टाळावे.
✳️ शेतातील व आजुबाजुचे तण, कचरा नष्ट करावा आणि पिकांची फेरपालट करावी.
✳️ जिथे मुळकुज रोग अस्तित्वात आहे किंवा मागील वर्षी या रोगाचा प्रादुर्भाव होता, त्या ठिकाणी कपाशीचे पीक घेणे टाळावे.
✳️ पाण्याचा प्रवाह मुळकुज ग्रस्त ठिकाणाहून निरोगी पिकांकडे नसावा.
✳️ भाजीपाला पिकाखाली असलेल्या मुळकुज ग्रस्त भागात कपाशीचे पीक घेणे टाळावे.
✳️ एक पीक पद्धती टाळावी. कारलेवर्गीय आणि भाजीपालावर्गीय पिके कपाशीलगत लावू नये.
✳️ उमललेले बोंड त्वरीत काढावे जेणेकरून बियाण्यांद्वारे पसरणारे रोगकारक घटक पुढच्या हंगामात वहन होणार नाहीत.

सूत्रकृमींचे एकात्मिक व्यवस्थापन
✳️ कपाशीच्या पिकात वृक्काकार सूत्रकृमिना आधार देणारी अमरवेल, पांढरी घेटुली व चांदवेल या तणांचे नियंत्रण करून सूत्रकृमींचा उपद्रव नियंत्रणात ठेवता येते.
✳️ पिकांना चांगले कुजलेले सेंद्रिय खत द्यावे.
✳️ उन्हाळ्यात खोल नांगरणी करून माती कडक सूर्यप्रकाशात तापू द्यावी.
✳️ पिकांची फेरपालट : सूत्रकृमींना आधार न देणाऱ्या पिकांची (झेंडू, ज्वारी, मोहरी, करडई ईत्यादी) लागवड करून सूत्रकृमींचे प्रभावी नियंत्रण करता येते.
✳️ मुळगाठ सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी दयाळी (Crotalaria Spectabilis) ची पेरणी केल्यावर 30 ते 45 दिवसानंतर त्यावर नांगरणी करावी.
✳️ जैविक नियंत्रण : बियाण्यास जैवनियंत्रक जिवाणू ग्लुकोनासोबॅक्टर डायजोट्रॉफीकस स्ट्रेन 35-47 सीसीएस एचएयू, हिस्सार, हरियाणा यांचा एक किलो कार्यशील घटक प्रती हेक्टर या प्रमाणात घेऊन मातीत मिसळल्यास झाडांच्या मुळांवर गाठी निर्माण करणाऱ्या सूत्रकृमींचे प्रभावी नियंत्रण करता येते.
✳️ सूत्रकृमींच्या अंड्यांना संक्रमण करणारी परभक्षी बुरशी पेसिलोमायसेस लीलासीनस यांचा वापर सुद्धा एक चांगला उपाय आहे.
✳️ मातीत कडुलिंबाच्या बियांची ढेप, करंजीची ढेप, मोहाची ढेप वगैरे टाकून मातीची सुधारणा मुळांवर गाठी निर्माण करणाऱ्या सूत्रकृमींचे प्रभावी नियंत्रण करता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!